esakal | बारामतीत ज्ञानदानाचा अखंड तेवणारा दीप : टीसी महाविद्यालय....
sakal

बोलून बातमी शोधा

t c college baramati

समाजाला अनेक मान्यवर नागरिक देणा-या व अनेक पिढ्या घडविणा-या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा आज वर्धापन दिन आहे.

बारामतीत ज्ञानदानाचा अखंड तेवणारा दीप : टीसी महाविद्यालय....

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : समाजाला अनेक मान्यवर नागरिक देणा-या व अनेक पिढ्या घडविणा-या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आज वर्धापन दिन आहे.

ज्ञानदानाचे झोकून काम करणा-या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेगळ्या मुशीत घडविल्याने राज्यातच नव्हे तर देशात या महाविद्यालयाचा वेगळा नावलौकीक आहे. गेल्या पन्नास वर्षात सातत्याने आधुनिकतेची कास धरत नवीन शिक्षण प्रणालीचा अवलंब करत काळाची पावले ओळखून हे महाविद्यालय सातत्याने कात टाकत राहिले. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

या महाविद्यालयाची स्थापना 23 जून 1962 रोजी झाली. तेव्हा सुमारे शंभर विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या महाविद्यालयात आजमितीस 12 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास युजीसीकडून स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. महाविद्यालयास नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त महाविद्यालय 58 वे रँकिंग प्राप्त झाले. युजीसीकडून 'परामर्श' स्कीम, सीपीई दर्जा, डीबीटीतर्फे 'स्टार कॉलेज स्कीम'चा दर्जा, तसेच डीएसटी फिस्ट, यासारख्या योजनांमधून भरघोस अनुदान प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'आयएसओ 9001-2015, ग्रीन ऑडीट मानांकन महाविद्यालयाने मिळविलेले आहे.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

या संस्थेचे अध्यक्ष अरहतदास सराफ, सचिव जवाहर वाघोलीकर, सुनील लेंगरेकर, मिलिंद वाघोलीकर, विकास लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या प्रगतीची वेगाने घौडदौड सुरु आहे. नॅककडून महाविद्यालयाला अ+, सीजीपीए मानांकन प्राप्त झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ देत उल्लेखनीय मानांकनाची भर घातली आहे. तसेच, पर्ल फाउंडेशन, मदुराई यांनी महाविद्यालय, प्राचार्य, प्राध्यापक, रजिस्ट्रार यांना असे विविध 11 पुरस्कार प्रदान केले. या वर्षी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 'उत्कृष्ठ युनिट पुरस्कार' व उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. 

धक्कादायक, दौंडमधील डाॅक्टर दांपत्याला कोरोनाची बाधा, 58 जणांना...

या महाविद्यालयात पदवीस्तरावर 25, पदव्युत्तर स्तरावर 19 विषयांचे अध्यापन केले जाते. बी. व्होकेशनल या व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत फुड प्रोसेसिंग ऍण्ड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉंलॉजी, जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन, रिटेल मॅनेजमेंट, ई-कॉमर्स आणि सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन ऍण्ड नेट्वर्किंग, तसेच एम. व्होक. फूड प्रोसेसिंग व मास मिडिया हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. 

निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक; जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम

कोरोनाच्या महासंकट काळात व्हर्च्युअल ऑनलाईन शिक्षण पध्दतीने आधुनिक कोर्सेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीने ‘पढेंगा भारत’शी नुकताच करार केला आहे. स्कील्ड युथ तयार करण्याच्या दृष्टीने विविध स्कील्स आत्मसात होऊन विद्यार्थी सक्षम व्हावा म्हणून महाविद्यालयाने विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुरु केले आहेत. कथ्थक, फोटोग्राफी, नाट्यप्रशिक्षण, जर्मन व फ्रेंच, मोडीलीपी असे विविध कोर्सेस सुरु केले आहेत. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एज्युकेशनल हबचा कणा 
बारामतीचे टीसी महाविद्यालय म्हणजे एज्युकेशल हब म्हणून ज्या बारामतीची ओळख आहे, त्याचा कणा व सर्वात जुना दुवा आहे. या महाविद्यालयाने सलग 50 वर्ष ज्ञानदानाचे अखंड कार्य करत अनेक सुजाण नागरिक घडविण्याचे काम केलेले आहे.