पुण्यातील ग्रुप कॅप्टन सागर परांजपे यांना दिल्लीतील कार्यक्रमात दोनवेळा संधी

Sagar-Paranjape
Sagar-Paranjape

पुणे - दिल्लीतील हवाई दलाच्या संचलनाचे नेतृत्त्व पुण्यातील ग्रुप कॅप्टन सागर मधुकर परांजपे यांनी नवी दिल्ली येथे गुरुवारी केले. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले होते. हवाई दलातील एकाच अधिकाऱ्याने दोन वेळा संचलनाचे नेतृत्त्व करण्याची दुर्मिळ घटना आहे.   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय हवाई दलाचा ८८वा स्थापना दिवस देशभर गुरूवारी दिमाखात साजरा झाला. या निमित्ताने दिल्लीतील हवाई दलाच्या हिंडन तळावर शानदार संचलन झाले. त्याचे नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन परांजपे यांनी केले. परांजपे हे पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण अभिनव शाळेत मराठी माध्यमातून झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) उत्तीर्ण होऊन १९९४ साली हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये वैमानिक म्हणून रूजू झाले. ते मिग २१च्या तुकडीत कार्यरत होते.

उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याबद्दल राष्ट्रपतींतर्फे त्याला वायू सेना मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. वयाच्या ४९ व्या वर्षांपर्यंत वायुसेनेच्या संचलनाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com