
लोणी काळभोर(पुणे) : चालत्या मोटरसायकलवरुन धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भिगवण येथुन शनिवारी (ता. 21) ताब्यात घेतले आहे.
पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटचा तीर्थ पुन विजेता
श्रीकांत विजय पवार व अजय चंद्रकांत सोरटे (रा. करमाळा जि. सोलापूर) ही त्या दोन अट्टल गुन्हेगारांची नावे असून, वरील दोघांनीही पंधऱा दिवसापुर्वी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील यशोदा दिगंबर घुले यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी चोरुन नेल्याची कबुली दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद्ममाकर घनवट यांनी दिली.
नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत
पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत सहा डिसेंबरला यशोदा घुले या घरासमोर थांबल्या असतांना, भरधाव मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी घुले यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाची सोनसाखळी हिसका देऊन चोरून नेली होती. याबाबत लोणी काळभोर पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र मागील काही दिवसात अशाच प्रकारचे गुन्हे लोणी काळभोर सह भिगवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने तपास सुरु केला होता.
पुणे धावले! बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
दरम्यान, मोटारसायकलवरुन दोन संशयित साखळी चोर भिगवण (ता. इंदापुर) एसटी बस स्थानकात शनिवारी सायंकाळी येणार असल्याची माहिती एका खबऱ्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना दिली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी दत्तात्रेय गुंड व त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, रौफ इनामदार, काशिनाथ राजापुरे विजय कांचन जनार्दन शेळके राजू मोमिन, धीरज जाधव व अक्षय जावळे यांनी भिगवन एसटीबस स्थानकात सापळा रचला होता. यात श्रीकांत पवार व अजय सोरटे हे दोघेजण सहज सापडले. वरील दोघांच्याकडे अधिक चौकशी केली असता, भिगवन व लोणी काळभोर हद्दीत सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे केल्याची कबुली दोघांनी दिली. तसेच वरील दोन आरोपींच्याकडून पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!
पिंपरी : अनैतिक संबंध उठताहेत जिवावर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.