esakal | हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; दोन पत्रकारांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; दोन पत्रकारांना अटक

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे : हॉटेल मधील परमिट रूममध्ये जाउन एका वेब पोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून एक हजार रूपये घेतल्यानंतरही पाच हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघा कथित पत्रकारांना (Journalist) खडक पोलिसांनी (Khadak police) अटक केली. हा प्रकार शनिवारी दुपारी शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकाजवळ घडला. (Two journalists arrested demanding ransom from hotel businessman)

सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय ५७, रा. वाघोली) व त्याच्या साथीदार महिलेला अटक करण्यात आली. याप्रकरणी भैरोबानाला येथील 30 वर्षीय व्यक्तिने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकात हॉटेल व परमिट रूम आहे. शनिवारी दुपारी त्यांच्या हॉटेलमध्ये एका महिलेसह दोघेजण आले.

हेही वाचा: बंदी असतानाही कात्रजजवळ बैलगाडा शर्यत, 12 जणांविरुद्ध गुन्हा

त्यांनी "क्राईम चेक टाईम" नावाच्या वेब पोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगत त्यांचे ओळखपत्र दाखविले. त्यांनी "तुम्ही अवैधरित्या दारूची विक्री करीत आहात, लोकांना परमीट रूममध्ये बसवून दारू विक्री करीत आहात. प्रकरण मिटवायचे असल्यास एक हजार रूपये द्या," अशी मागणी करून एक हजार रूपयांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपींनी परमीट रूम मालकाला फोन करून प्रकरण मिटवायचे असल्यास पुन्हा पाच हजारांची खंडणी मागितली.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येणे टाळावे - बंडातात्या कराडकर

त्यानंतर फिर्यादीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली. याप्रकरणी संबंधित आरोपींकडील ओळखपत्रे आणि त्यांच्या वेबपोर्टल संदर्भात माहिती घेण्यात येत आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले.

loading image