Mahadev Babar_Uddhav Thackeray
पुणे
Mahadev Babar: पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! महादेव बाबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
Mahadev Babar : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे पक्षांतर होत असल्याची चर्चा आहे. पण यामुळं शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे.
Mahadev Babar: पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर निलेश मगर, योगेश ससाणे तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे पक्षांतर होत असल्याची चर्चा आहे. पण यामुळं शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे.

