
सकाळपासून एमआयडीसीतील रिक्रीएशन हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. एकेक निकाल हाती यायला लागल्यानंतर उमेदवारांच्या चेह-यावर हास्य व दुःख अशा प्रतिक्रीया स्पष्टपणे पाहायला मिळाल्या.
बारामती : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही कायम दिसले.
सकाळपासून एमआयडीसीतील रिक्रीएशन हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. एकेक निकाल हाती यायला लागल्यानंतर उमेदवारांच्या चेह-यावर हास्य व दुःख अशा प्रतिक्रीया स्पष्टपणे पाहायला मिळाल्या. यंदा जिल्हाधिका-यांनी गुलाल उधळण्यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई केल्याचा चांगला परिणाम जाणवला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत विजयी उमेदवारांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढली. सर्वच विजयी उमेदवारांनी आपापल्या गावाकडे प्रयाण केल्यामुळे हळुहळू गर्दीही ओसरली.
Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
तहसिलदार विजय पाटील यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे वेगाने निकाल हाती आले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, राहुल आवारे यांच्यासह पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे व सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सांगवीमध्ये चंद्रराव तावरे यांनी ताकद लावली होती मात्र तेथेही राष्ट्रवादीच्या दहा उमेदवारांचा तर तावरे यांच्या पाच उमेदवारांचा विजय झाला, माळेगाव कारखान्यापाठोपाठ सांगवी गावातही चंद्रराव तावरे यांना पराभव स्विकारावा लागला. अनिल तावरे, प्रकाश तावरे, महेश तावरे, किरण तावरे यांनी संयुक्त प्रयत्न करीत सांगवी येथे राष्ट्रवादीकडे सत्ता खेचून आणली. ही निवडणूक तालुक्यात प्रतिष्ठेची होती.
कांबळेश्वर मध्ये माजी सभापती करण खलाटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या विरोधातील सुरेश खलाटे व गणपत खलाटे यांच्या पॅनेलला आठ जागा तर करण खलाटे यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
को-हाळे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळविला. खोमणे यांच्या पॅनेलला आठ जागा मिळाल्या. सुनील भगत यांच्या पॅनेलला चार, लालासाहेब माळशिकारे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या.
Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...
वडगावनिंबाळकर मध्ये सुनील ढोले, धैर्यशिल राजेनिंबाळकर व अनिलकुमार शहा यांच्या पॅनेलला अकरा जागा मिळाल्या. संग्रामसिंह राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या.
होळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या पॅनेलला अकरापैकी दहा जागा मिळाल्या. त्यांनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभव पत्करावा लागला.
निंबूत ग्रामपंचायतीत नऊ जागा प्रमोद काकडे व सतीश काकडे यांच्या पॅनेलला तर सहा जागा गौतम काकडे व महेश काकडे यांच्या पॅनेलला मिळाल्या. सतीश व प्रमोद काकडे यांनी सत्ता राखली असली तरी प्रथमच त्यांच्या विरोधात सहा जागा निवडून आल्या.
झारगडवाडीमध्ये छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर व बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांच्या पॅनेलचा विजय झाला. 15 पैकी 11 जागांवर त्यांनी विजय मिळविला.
शेटफळगढे परिसरातील ग्रामपंचायतीत विजयी झालेले उमेदवार
निरगुडे ग्रामपंचायत-
काजळे हनुमंत बबनराव, खंडाळे बायडा सचिन, पवार सुषमा अमोल, केकाण साधना नवनाथ, लकडे चतुराबाई बबन, राऊत देवेंद्र राजेंद्र, रणधीर लताबाई विनायक, वाकडे अमोल शंकर, सोनवणे गौरी प्रदीप
पिंपळे ग्रामपंचायत-
सोनवणे सतीश नवनाथ, चोरमले अर्पिता गणेश, सूर्यवंशी हेमा दत्ता, भिसे कुंडलिक जनार्दन, काटे सविता रमेश, बागल अनिल बबन, एकाड हेमा रवींद्र
शेटफळगढे ग्रामपंचायत-
राहुल जनार्दन वाबळे, शितल गोपाळ धुमाळ,
शंकर सोपाना राऊत,,(बिनविरोध),रूपाली संतोष वाबळे,अंबादास नामदेव भोसले सोमनाथ दामू सवाणे, पल्लवी सागर भोसले,, ज्ञानेश्वर दादासो वाबळे, विद्या सुनील सवाणे
अर्चना अर्जुन कुंभार, ज्ञानदेव नरहरी भोसले, रूपाली संदीप मचाले, जयश्री विक्रम झगडे ( बिनविरोध)
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल
बारामती तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीचे निकाल आज जाहिर झाले. बहुसंख्य ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून अनेक ठिकाणी थोडया फार फरकाने उमेदवार पराभूत व विजयीही झाले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
1 झारगडवाडी- प्रशांत बोरकर, कल्पना झारगड, निर्माण शेडगे, मालन टिंगरे, सोनाली चव्हाण, अजित बोरकर, वैष्णव बळी, पूनम आवटे, अजिनाथ बुरुंगले, संतोष नेवसे, अनिता जाधव, मोनाली राऊत, सोनाली करे, वैशाली मासाळ, पद्मनाभ निकम.
2 सांगवी- अनिल काळे, पौर्णिमा लोंढे, छाया तावरे, कमल गायकवाड, चंद्रकां तावरे, नीलीमा जगताप, विजय तावरे, विठाबाई एजगर, स्वाती वाघ, सिध्दार्थ जगताप, अनिल तावरे, अनिता तावरे, विलास आडके, प्रणव तावरे, स्वाती तावरे.
3 माळवाडी लोणी- अनिता दगडे, वैशाली यादव, दत्तात्रय लोणकर, मंजू लडकत, अनिल लडकत, गणेश बोरावके, निर्मला लोणकर.
4 पाहुणेवाडी- दादा जगताप, राधिका भंडलकर, उज्वला तावरे.
5 मोढवे- सुनील मोरे, अलका भगत, राजेंद्र मोरे, सुलोचना बनकर, वैभव मोरे, शीतल मोरे, तान्हूबाई माने, सुलोचना भोसले, सतीश शिंदे.
6 कारखेल- पूनम भोसले, रुपाली चव्हाण, वैशाली रणसिंग, सचिन कुचेकर.
7 सोनवडी सुपे- स्नेहल साळुंके, असिफ सय्यद, नजमा सय्यद, पूजा साळुंके.
8 ब-हाणपूर- बाळासाहेब चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे, सुखदेव नाळे, प्रमोद चांदगुडे, नीलम चांदगुडे, राजेंद्र मोरे, सोनाली गवळी, माया आहेरकर.
9 ढेकळवाडी- सीमा भालेराव, सीमा ठोंबरे, राहुल कोळेकर, अजित घुले, अर्चना देवकाते, अमोल समिंदर.
10 मुर्टी- छाया मोरे, मंगल खोमणे, किरण जगदाळे, प्रियंका गदादे, सुप्रिया राजपुरे, किरण जगदाळे,
11 वडगावनिंबाळकर- राहुल आगम, मोहन बनकर, प्रमोद किर्वे, अजित भोसले, प्रेमलता रांगोळे, भानुदास दरेकर, सीमा राऊत, लता परांडे, संजय साळवे, मयुरी साळवे, राजश्री साळवे, धैर्यशिल राजेनिंबाळकर, अश्विनी खोमणे, संगीता शहा, सुनील ढोले, सारिका खोमणे, स्वाती हिरवे.
12 मेखळी- आनंदा देवकाते, उषा कोळेकर, अनिता चोपडे, रणजित देवकाते, दीपक भोसले, युवराज देवकाते.
13 घाडगेवाडी- पूनम तुपे, संगीता चव्हाण, बाळू साबळे, वंदना महामुनी, रेश्मा शिंदे, राजकुमार शेडगे, विष्णू काटकर, ज्योती वाघ, शरद चव्हाण.
14 चोपडज- मंगल गायकवाड, पुष्पलता जगताप, विद्या कोळेकर, मनिषा भोसले, पांडुरंग कोळेकर, स्वाती यादव, तुकाराम भंडलकर, रुक्मिणी पवार, जयश्री गाडेकर, सागर गाडेकर, सुधीर गाडेकर.
15. मोराळवाडी- विलास बरकडे, सीमा माघाडे, किरण कारंडे, नीलेश मासाळ, सारिका नागरगोजे.
16 माळवाडी लाटे- अजय बनकर, छाया भेलके, अशोक खलाटे, नंदा सोनावणे, उज्वला खलाटे, रामचंद्र दानवले.
17. निंबूत- सुवर्णा लकडे, आरती काकडे, शिरीष काकडे, निर्मला काळे, रवींद्र जमदाडे, विद्यादेवी काकडे, योगिता दगडे, अमर काकडे, नंदकुमार काकडे, निर्मला बनसोडे, प्रमोद बनसोडे, कुसुम काकडे, उषा पवार, सुरेश अत्तार, वैशाली काकडे.
18. कण्हेरी- भारती शेलार, संतोष काटे, तेजस्विनी शिंदे, मीराबाई मोहिते, देविदास देवकाते, सुरेखा शेलार, दत्तात्रय शेलार, सुनिता पवार.
19.सोनगाव- शीतल भोसले, शैला गोफणे, योगेश बनकर, जयश्री थोरात, पप्पू सोलनकर, नितीन कांबळे, वर्षा जाधव, शुभांगी देवकाते, राजू ताटे, अस्लम मुलाणी, शीतल इंगवले, अंबिका माने.
20. खंडोबाची वाडी- अजित लकडे, वर्षाली कटरे, भाग्यश्री गडदरे, श्रुती मदने, संतोष धायगुडे, मनीषा फरांदे, मंगल ठोंबरे.
21. वढाणे- लक्ष्मी चौधरी, भानुदास चौधरी, रामदास चौधरी, विजय कौले, प्रगती चौधरी, शुभांगी चौधरी, गंगुबाई लकडे, सुनील चौधरी.
22. खराडेवाडी- मंगल भोसले, रोहिणी भापकर, वैभव खराडे, सुनिता खराडे.
23. सावळ- नितीन भिसे, सारिका आटोळे, ज्योती आवाळे, रोहिणी खोमणे, तृप्ती वीरकर, फक्कड बालगुडे, सुनिता आवाळे, अंजली आवाळे, चेतन आटोळे.
24. शिरवली- अरविंद कांबळे, प्रणिता पोंदकुले, माधवी बागव, प्रदीपकुमार पोंदकुले, निशीकांत निकम, शुभांगी खारतुडे, संगीता माने, अमोल डांगे, मंगल घनवट, माधुरी मदने, अनिल राऊत.
25. मळद- विकास भोसले, युवराज शेंडे, सारिका पिसाळ, किरण गावडे, सुनिता सातव, आशा मोहिते, बजरंग पवार, जया चव्हाण, सुवर्णा जाधव, प्रफुल्लकुमार गावडे, योगेश बनसोडे, अपर्णा आटोळे, आशा लोंढे.
26. लाटे- संग्राम भोई, माधुरी खलाटे, प्रशांत खलाटे, उषा खोमणे, वंदना ताकवले, उमेश साळुंके, कुमार ननवरे, मनीषा खलाटे, शीतल खलाटे.
27. शिरष्णे- अजित काशिद, काजल पवार, योगेश खलाटे, लता पिंगळे, मोनिका खुटवड, सुधीर पिंगळे, जितोबा खरात, सविता पिंगळे, नंदा भेलके.
28. होळ- सूरज कांबळे, रुपाली होळकर, आशाबाई वायाळ, संतोष होळकर, उज्वला होळकर, सुजाता भिसे, छाया भंडलकर, दीपक वाघ, सुनंदा कर्चे, तानाजी वायाळ, रमेश वायाळ.
29.सस्तेवाडी- भीमाबाई टकले, वैजंता टकले, किरण कदम, विद्या आवटे, बापूराव ठोंबरे, शोभा मोरे, पूजा साळुंके, प्रवीण कारंडे, योगेश सस्ते.
30. ढाकाळे- संदीप होले, पूजा खामगळ, राहुल खामगळ, पूजा जगताप, सुवर्णा जाधव, चंद्रसेन जगताप.
31. पिंपळी- राहुल बनकर, उमेश पिसाळ, मंगल केसकर, आबासाहेब देवकाते, अश्विनी बनसोडे, संतोष ढवाण, मंगल खिलारे, अजित थोरात, मीनाक्षी देवकाते, निर्मला यादव.
32. खांडज-रवींद्र आटोळे, पार्वती चव्हाण, रेखा वाघ, नर्मता आटोळे, सूर्यकांत बर्गे, अर्चना आटोळे, प्रदीप माने, शीतल कांबळे, सचिन घाडगे, बापट कांबळे, शेखर जाधव, मयूरी पवार.
33 को-हाळे बुद्रुक- अनिल शिंदे, कल्पना माळशिकारे, वैशाली माळशिकारे, हनुमंत जगदाळे, सुनीता खोमणे, लता नलवडे, आबा पडळकर, अश्विनी चव्हाण, दिव्याभारती खोमणे, राजेंद्र पवार, रवींद्र खोमणे, आशाबी सय्यद, मोहन भगत, अमर भगत, वनिता निकम.
34. कांबळेश्वर- मंगल जायपत्रे, सीमा खलाटे, प्रवीण जगताप, मंदाकिनी कानडे, अनुजा खलाटे, गिरीश खलाटे, संगीता जगताप, प्रकाश खलाटे, किरण आगवणे, सचिन वाघमारे, मंगल कुंभार.
35. देऊळगाव रसाळ-सल्लाउद्दीन इनामदार, मनिषा वाबळे, वैशाली वाबळे, राहुल लोंढे, मीराबाई रसाळ, दत्तात्रय वाबळे, शीतल रसाळ, सुरेश रसाळ.
36. सदोबाचीवाडी- मनीषा होळकर, परवीन शेख, लक्ष्मण होळकर, कोमल कारंडे, संगीता फराटे, अजित पिसाळ, बंडू कर्चे, कविता जाधव, ऋषीकेश धुमाळ.
37. अंजनगाव- नीलम मोरे, सविता परकाळे, सत्पाल चव्हाण, शोभा वायसे, प्रतिभा परकाळे, छाया मोरे, सुभाष वायसे, वंदना परकाळे, नामदेव परकाळे.
38. उंडवडी सुपे- गणेश माकर, अश्विनी मांढरे, गोरख गवळी, राणी नलवडे, अनिल गवळी, लता जगताप, रोहिणी गवळी, प्रकाश गवळी.
39. नीरावागज- विद्या भोसले, उज्वला देवकाते, हेमंत देवकाते, सुनिता कुंभार, संग्राम देवकाते, सुनिल देवकाते, शीतल धायगुडे, पल्लवी देवकाते, जगदीश देवकाते, सागर देवकाते, ललिता भोसले, पोपट उर्फ उदयसिंह देवकाते, तेजस्विनी देवकाते.
40. आंबी खुर्द- लालभाई शेख, छाया कुतवळ, पुष्पा कुतवळ, संगीता गाढवे, किशोर कुतवळ, निर्मला कदम, गौरव गाढवे.
41. तरडोली- अनिता पवार, संतोष चौधरी, नवनाथ जगदाळे, सागर जाधव, अश्विनी गाडे, विद्या भापकर, नबाबाई धायगुडे, स्वाती गायकवाड, महेंद्र तांबे.
42. कटफळ- सीमा मदने, संध्याराणी झगडे, संग्रामसिंह मोकाशी, विजय कांबळे, संजय मोकाशी, सविता लोखंडे, पूनम कांबळे, तात्याराम रांघवन.
43. गोजुबावी- कुंदा कदम, कल्याण आटोळे, किशोर जाधव, हिराबाई जाधव, माधुरी कदम, सुनिता गावडे, माधुरी सावंत.
44. थोपटेवाडी-शिवाजी कोरडे, शुभांगी अडागळे, राणी पानसरे, संतोष खांडेकर, रेखा बनकर, कमल थोपटे, कल्याण गावडे, पृथ्वीराज नलावडे, सीमा थोपटे.
45. नारोळी- भारती ढमे, दत्तात्रय ढमे, प्रदीप गिरीगोसावी, मीना ढमे, कोमल सोनवणे, अक्षय़ कोंडे.
46. जोगवडी- सचिन सोनवणे, अर्चना जाधव, सारिका महानवर, प्रभु महानवर, रेखा भोसले.
47. बाबुर्डी- शारदा लडकत, दिपाली जगताप, दत्तात्रय ढोपरे, ज्ञानेश्वर पोमणे, अर्चना पोमणे, मंगल लव्हे.
48. जैनकवाडी- संदीप शेंडे, स्वाती पवार, रुपाली सूर्यवंशी, धनश्री लोखंडे, सतीश लोखंडे, बाळासाहेब माने.
49. जळगाव सुपे- समीर खोमणे, कौशल्या खोमणे, दिलीप खोमणे, स्वाती जगताप, सुन्नाबी मुजावर, कैलास जगताप, नयना जगताप, मनीषा खोमणे, दीपक येडे.