पुणे : महावितरणच्या खांबांचा वाहतुकीस होतोय अडथळा

Mahavitaran
Mahavitaran

किरकटवाडी (पुणे) : अगोदरच अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ महावितरणच्या वापरात नसलेल्या खांबांचा वाहतुकीस अडथळा होत आहे. आठ ते दहा फूट रुंदीचा रस्ता या बंद विजेच्या खांबांमुळे वापराविना पडून आहे.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अनेक अपघातही नांदेड फाट्याजवळ झालेले आहेत. अगोदरच रस्ता अरुंद आहे आणि त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्यामुळे रस्त्याची रुंदी आणखीच कमी झालेली आहे. रस्त्याच्या एका बाजूला महावितरणच्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या मुख्य वीजवाहिनीचे खांब उभे आहेत. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग वापराविना पडून आहे. महावितरणने वापरात नसलेले सदर खांब काढल्यास नांदेड फाट्याजवळ दररोज उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.

"महावितरणच्या बंद असलेल्या वीज वाहिनीच्या खांबांचा अरुंद गल्ल्यांमधून वाहने बाहेर काढताना खूप मोठा अडसर निर्माण होत आहे. तसेच खांब काढल्यास मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासही मदत होईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अपघाताची वाट न पाहता वेळीच खांब काढून घ्यावेत."
- तेजस हुलावळे, भाजपा, खडकवासला विद्यार्थी आघाडी अध्यक्ष.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com