esakal | उरुळी कांचन : ओढ्यांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा महापूर
sakal

बोलून बातमी शोधा

ओढ्यांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा महापूर

उरुळी कांचन : ओढ्यांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा महापूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : येथील ग्रामपंचायत हद्दीतून मुळा-मुठा नदीला जाऊन मिळणाऱ्या ओढ्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचा जणू महापूर पूर आल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच ओढ्यातील पाण्याला रंगही वेगळा दिसत असून ओढ्यातून मैला मिश्रित पाणी वाहत असल्याने परिसरात या पाण्याचा वासामुळे दुर्गंधी सुटल्याने स्थानिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील या ग्रामपंचायत हद्दीत ओढा आहे. या ओढ्याच्या साहाय्याने पावसाचे व इतर पाणी मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर सोडले जाते. परंतु काही नागरिक घरातील कचरा, हॉटेलमधील दूषित अन्न व कचरा, सडलेल्या भाज्या, मैला, चिकनच्या दुकानातील खराब पीस, आदी पदार्थ या ओढ्यात टाकत असल्याने ओढ्याच्या पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे सदर कचरा कुजल्याने त्या ठिकाणावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त वासाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: Pune : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या कर्ज वसुली अधिका-यास अटक

प्लॅस्टिक तसेच इतर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगावर कुत्री, कावळे, डुक्कर, मोकाट जनावरे गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, गावापासून जवळ असलेली स्मशानभूमी ही ओढ्यापासून जवळ असल्याने अंत्यविधीला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमय वातावरणात अंत्यविधीला जावे लागत आहे. तसेच ओढ्यात दारूच्या बाटल्या, शिवाय पेपरप्लेट किंवा थर्माकोल डिश, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या या गोष्टी अविघटनशील असल्याने या ठिकाणी साचून राहत आहेत. ग्रामपंचायतीने या ओढ्यातील प्लास्टिक पिशव्या व काटेरी झाडे जेसीबीच्या सहाय्याने साफ करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतर्फे उपसरपंच संचिता कांचन यांनी केली आहे.

हेही वाचा: "मंडळांनो, यंदा गणेशोत्सवात गर्दी टाळा"

काटेरी झाडे-झुडपे हटविण्याची मागणी

ओढ्यातील कचऱ्याबरोवर ओढ्यामध्ये मोठमोठी काटेरी झाडे उगवून आली आहेत. काटेरी झाडांना प्लॅस्टिक पिशव्या अडकत असून, पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. त्यातच जलपर्णीमुळे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. याचा त्रास ओढ्या शेजारी राहणाऱ्या व या ठिकाणावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना व या ठिकाणी व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांना बसत आहे. यामुळे ओढ्यांतील काटेरी झाडे-झुडपे हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: इंदापूर : 'सकाळ' माध्यम समूह हा समाजमनाचा आरसा - अंकिता शहा

"राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केलेलीच आहे, पण शासनाने कडक निर्बंध घालून प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. औद्योगिक क्षेत्रातील प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपन्या बंद झाले तर आपोआपच प्लॅस्टिकच्या पिशव्यांची निर्मिती बंद होईल. तसेच प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश दिले तर ग्रामपंचायत कार्यालयातर्फे ठोस कारवाई केली जाईल."

- संतोष कांचन, सरपंच, उरुळी कांचन

loading image
go to top