भोर शहरातील भाजी मार्केट उद्यापासून... 

विजय जाधव
शनिवार, 23 मे 2020

भोर शहरात जवळपासच्या खेड्यातील अनेक जण खरेदीसाठी येतात. याशिवाय खेड्यातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी शहरातच आणतात. त्यामुळे भोरच्या भाजी मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

भोर (पुणे) : लॉकडाउनच्या काळात भोर शहरात सर्वाधिक गर्दी ही भाजी मार्केटमध्ये होत आहे. त्यामुळे रविवार (ता. 24) ते बुधवार (ता. 27) या चार दिवसांकरिता भोरमधील भाजी मार्केट बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. 

आळंदीच्या वेशीवर कोरोना, अंगणात मात्र चिकुनगुणियाचे थैमान  

भोर तालुक्‍यातील नेरे येथील कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी रायरी येथे कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळून आला आहे. भोर शहरात जवळपासच्या खेड्यातील अनेक जण खरेदीसाठी येतात. याशिवाय खेड्यातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी शहरातच आणतात. त्यामुळे भोरच्या भाजी मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालनही केले जात नाही. नगरपालिका प्रशासन व पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही भाजी मार्केटमध्ये गर्दी कायम राहाते. भाजी मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा नियमित होत आहे. 

मित्राच्या बर्थडे पार्टीत झिंगाट झालेले थेट पोचले... 

या कारणांमुळे नगरपालिकेने पोलिस ठाण्यासमोरील नगरपालिकेच्या शाळेच्या मैदानावर भाजी मार्केटची व्यवस्था केली आहे. परंतु, नागरिकांमध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही. काही व्यक्ती भाजी घेण्याच्या नावाखाली मार्केटमध्ये फिरत बसतात आणि काही व्यक्ती घरात करमत नाही आणि भाजी मार्केटमध्ये पोलिसांचा त्रासही कमी असतो, म्हणून मार्केटमध्ये येतात. त्यासाठी नगरपालिकेच्या अधिकारी- पदाधिकाऱ्यांनी रविवार ते बुधवार हे चार दिवस भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

दरम्यान, पोलिस व तालुका प्रशासनासमवेत बैठक घेऊन नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे. गुरुवारपासून (ता. 28) नवीन नियमांची कडक अंमलबजावणी करून भाजी मार्केट सुरू केले जाणार असल्याचेही मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable market in Bhor city from tomorrow