esakal | बारामतीकरांची भाजीची चिंता मिटली, मंडई पुन्हा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

baramti market

बारामती शहरातील श्री गणेश मार्केट भाजी मंडई गेल्या अनेक दिवसांच्या कालखंडानंतर आज पुन्हा पूर्ववत सुरु झाली. 

बारामतीकरांची भाजीची चिंता मिटली, मंडई पुन्हा सुरू

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील श्री गणेश मार्केट भाजी मंडई गेल्या अनेक दिवसांच्या कालखंडानंतर आज पुन्हा पूर्ववत सुरु झाली. 

दिलासादायक, जुन्नर तालुक्यातील ही पाच गावे झाली कोरोनामुक्त

बारामती शहरातील श्री गणेश मार्केट भाजी मंडई सुरु करण्याचा निर्णय काल रात्री उशीरा मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी घेतला. त्या नुसार आज सकाळपासून भाजीविक्रेत्यांनी मंडईत बसून विक्री करण्यास प्रारंभ केला. 

बारामतीतील कोऱ्हाळे येथील ज्येष्टाचा कोरोनाने मृत्यू


मंडईत होणारी लोकांची गर्दी पाहून मंडई बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे जीवनाश्यक असलेली भाजी व फळे घरपोच देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. या शिवाय भाजी विक्रेत्यांनी घरोघर जाऊन विक्रीला प्रारंभही केला होता.
 
जीवनाश्यक वस्तू म्हणून भाजीकडे पाहिले गेले. मात्र, मंडईत होणारी गर्दी चिंताजनक होती. त्याचा विचार करुन प्रशासनाने मंडईतील गर्दी टाळण्यासाठी बंदचा निर्णय घेतला होता. आता मात्र जनजीवन सुरळीत होणे गरजेचे असल्याने आजपासून विविध बंधने शिथील करण्याचा निर्णय झाल्याने आजपासून मंडईही सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासह सॅनेटायझर व मास्कचा वापर करण्यासह बाकीच्या अटी घालून मंडई सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दौंड तालुक्यातील गिरीम येथे 21 लाखांचा गांजा जप्त

आज सकाळच्या सत्रात लोकांना मंडई सुरु झाल्याची माहितीच नव्हती. त्यामुळे मंडईत गर्दी नव्हती. विक्रेतेही उशीराने येत असल्याने रविवारीच ख-या अर्थाने मंडई सुरु होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


मंडई सुरु झाल्याने विक्रेते व ग्राहक दोघांचीही आता सोय होणार आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी परिपूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.