esakal | Vidhan Sabha 2019 : मेधा कुलकर्णींना जास्त वाट पहावी लागणार नाही : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan sabha 2019 bjp leader chandrakant patil statement on medha kulkarni kothrud pune

पुण्यातील कोथरूडमधील भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही, असे सांगत त्यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.

Vidhan Sabha 2019 : मेधा कुलकर्णींना जास्त वाट पहावी लागणार नाही : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे :  विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला झालेला विरोध आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर अऩ्याय झाल्याची भावना यामुळे कोथरूडमध्ये सध्या काय चाललंय. याविषयी सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहेत. आज, भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही, असे सांगत त्यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.

नाशिकमध्ये मनसेची माघार; पाहा काय घडले?

कोथरूडमध्ये ब्राह्मण संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याविषयावरून ब्राह्मण महासंघात फूट पडली आहे. आज कोथरूडमध्ये झालेल्या बैठकीत कुलकर्णी यांच्यावर झालेल्या अन्यायाची अप्रत्यक्ष कबुली पाटील यांनी दिली. ‘मेधाताईंवर अन्याय झाला. पण, त्यांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज्यात बंडखोरी आहे. पण, भाजपचे सर्व बंडखोर उमेदवार माघार घेतील.’ ब्राह्मण समाजातील काहींच्या भूमिकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मत व्यक्त करणे हा जिवंतपणा आहे. समाजाच्या  मागण्यांवर बसून निर्णय घेऊ. तर न्यायालयीन विषयात सरकार योग्य ते प्रयत्न करेल.’

भाजनपने मला फसवलं : जानकर

'मित्रपक्षामध्ये चिन्ह वरुन नाराजी नाही'
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर थेट नाराजी व्यक्त केली असताना, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मित्रपक्षामध्ये चिन्ह वरुन कोणतीही नाराजी नाही. रामदास आठवलेंसोबत सदिच्छा भेट झाली आहे. कोथरूडने विश्वास टाकला तर, मला महाराष्ट्रात मोकळेपणाने फिरता येईल.’

होय, सत्तेसाठी युती केली : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंची मुलाखत पाहिली नाही
संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून, ती आज प्रसारीत करण्यात आली. त्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असे म्हटले आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘प्रत्येकाला लोकशाहीत इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, इच्छा व्यवहारात आल्यानंतरच निर्णय होतो, सध्या ईच्छा व्यवहारात येण्याची वेळ नाही, आज ती वेळ नाही, निकालनंतर हे स्पष्ट होईल.’ कोथरुड मध्ये एका मित्राच्या घरांमध्ये राहतोय, काही टीव्ही चॅनेले याच्याही बातम्या केल्या त्यांना पुरस्कार द्यायला हवा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

loading image