Vidhan Sabha 2019 : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं; गुरुवारी करणार उमेदवारी अर्ज दाखल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

हर्षवर्धन पाटील हे प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत.

इंदापूर : राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील हे गुरुवारी (ता. 3) दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी दिली.

शेंडे म्हणाले की, इंदापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत.

इंदापूर शहरातील श्रीराम वेस येथून सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटील यांची पदयात्रा सुरू होईल. त्यानंतर नवीन प्रशासकीय इमारत शेजारील मैदानावर दुपारी 12 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर हर्षवर्धन पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पदयात्रेमध्ये महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- ...म्हणून मुंडेंनी भगवानगड सोडून सावरगाव बनविले सत्तेचे केंद्र

- सेना-भाजप बंडखोरांना काॅग्रेसमध्ये संधी नाही..!

- Vidhan Sabha 2019 : अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपची रणनीती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Harshvardhan Patil will file his nomination for Assembly election on Thursday