‘करुन गेलं गाव अन् भलत्याच नाव’ अशी भाजपची अवस्था; शरद पवारांची टीका

Vidhan Sabha 2019 ncp leader Sharad Pawar rally at Pune Uruli kanchan
Vidhan Sabha 2019 ncp leader Sharad Pawar rally at Pune Uruli kanchan

पुणे : पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच 'करून गेलं गाव आणि भलत्याचंच नाव, अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे’, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

त्यांच्या तोंडी माझेच नाव
पुणे जिल्हयातील शिरुर मतदारसंघातील उरळी कांचन येथे आज शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या वेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. पवार म्हणाले, ‘आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली गेली. हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेली कामं नाहीत. मात्र, आज अवस्था काय आहे? पिंपरी-चिंचवड येथे मुलांना नोकऱ्यांमधून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता यांच्यात नाही. ’ ‘निवडणुकांच्या प्रचाराचा पारा सध्या चढू लागला आहे. गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी, यांच्या तोंडात माझेच नाव. निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत,’ अशा शब्दांत अमित शहा यांचे नाव न घेता शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

काश्मीरमध्ये कोण शेती करणार आहे?
पवार म्हणाले, ‘मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? जाब विचारता कसला? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे. अमित शहा महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मिरात कोण जाणार शेती करायला? कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. आत्महत्यांवर बोला. ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला.’ या साऱ्यांना भानावर आणायचे आहे. आपल्याला परिवर्तन करायचे आहे. बदल घडवायचा आहे म्हणून अशोक पवार यांना निवडून द्यायचे आहे. तुम्ही संधी दिली तेव्हा अशोक पवार यांनी चांगले काम केले. कारखाना योग्यप्रकारे चालवला मात्र, तुम्ही मागच्या वेळी वेगळा निर्णय दिला. त्यामुळे मागे घेतला तसा निर्णय घेवू नका, असे आवाहनही शरद पवार यांनी या वेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com