esakal | सलून आणि पार्लर कधी सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

vadettiwar

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील सलून आणि पार्लर बंदच ठेवण्यात आले होते.

सलून आणि पार्लर कधी सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बंद असलेले राज्यातील सलून आणि पार्लर आता लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. सलून आणि पार्ल़र सुरु झाल्यावर अटी आणि शर्तींचे पालन करावे लागेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी कऱण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितलं की राज्य सरकारने अद्याप सलून किंवा पार्लर सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र लवकरच यासाठीचा आदेश जारी केला जाईल अशीही माहिती त्यांनी दिली.

कोकणची बत्ती पेटविण्यासाठी बारामती- केडगावकरांची झुंज

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील सलून आणि पार्लर बंदच ठेवण्यात आले होते. यानंतर राज्यातल्या नाभिक समाजासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीची जाणीव सरकारला असून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसंच सरकार लवकरच सलून आणि पार्लर सुरू करण्याची योजना तयार करत असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितले. 

आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर हिची झाली तहसीलदारपदी निवड    

वडेट्टीवार म्हणाले की, यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. सरकार पुढच्या आठवड्याभरात निर्णय घेऊ शकते. मात्र सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. तसंच मास्क लावणे, सॅनिटाइझ करणे बंधनकारक असेल. 
तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे नाभिक समाजाचा व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे उरले नसल्याची भावना या समाजातून व्यक्त केली जात आहे. तसंच अनलॉकडच्या टप्प्यात सूट देताना सलून आणि पार्लर सुरु करण्यासाठी मात्र कोणताच निर्णय नव्हता त्यामुळे पार्लर सुरु कधी होणार याकडे नाभिक समाजाचे लक्ष लागून राहिले होते.