Vidhan Sabha 2019 : प्रस्तावित विकास साधन्यासाठी मतदार पुन्हा संधी देतील - टिळेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

भाग क्रमांक 22/6 साडेसतरानळी परिसरात पाणी व वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे या दोन्ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू असून येत्या काही महिन्यात हा भाग समस्यामुक्त करू, हा प्रस्तावित विकास साधन्यासाठी मतदार निश्चितपणे मला पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

पुणे (मांजरी) : प्रभाग क्रमांक 22/6 साडेसतरानळी परिसरात पाणी व वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे या दोन्ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू असून येत्या काही महिन्यात हा भाग समस्यामुक्त करू, हा प्रस्तावित विकास साधन्यासाठी मतदार निश्चितपणे मला पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

टिळेकरांना मताधिक्य देण्याचा मुस्लिम बांधवांचा संकल्प

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २२ मधील गाडीतळ, वेताळबाबा वसाहत, सातव प्लॉट, आकाशवाणी, पंधरा नंबर, लक्ष्मी कॉलनी, इंद्रप्रस्थ सोसायटी आदी भागात पदयात्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी येथील मतदारांशी संवाद साधताना उमेदवार टिळेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मतदारांनी उपस्थित केलेल्या समस्या कशा सोडविल्या जाणार आहेत याबाबतही त्यांनी या वेळी विश्लेषण केले.

टिळेकरांच्या प्रचारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शिवसेनेतील माजी नगरसेवक विजय देशमुख, हडपसर भाजपचे नेते भूषण तुपे, नगरसेविका ऊज्वला जंगले, युवा नेते संदीप दळवी, सतीश जगताप, नितीन होले, स्मिता गायकवाड, शिल्पा होले, मनिषा हिंगणे, बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा सविता हिंगणे, रवी लढाने, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घुले, तेजस गोंधळे, सुमित घुले, गौरव म्‍हस्‍के, बाळासाहेब राऊत, विशाल बहिरट आदी यावेळी उपस्थित होते.

हडपसर हा युतीचाच बालेकिल्ला - योगेश टिळेकर

उमेदवार टिळेकर म्हणाले,"स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी वाट्टेल ते आरोप करू लागले आहेत. माझा मात्र केवळ नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे. हडपसरचा कायापालट ते अनुभवत आहेत. या भागाला चोवीस तास पाणी आणि वहातूक समस्या सोडवण्यासाठी पंधरा नंबर येथील अंडरपास हे माझ्या कामातील महत्वाची कामे असणार आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters will give opportunity for development syas Tilekar