SWEEP Programme : (स्वीप) कार्यक्रमांतर्गत हडपसरमध्ये मतदान जनजागृती

हडपसर विधानसभा सहाय्यक निवडणूक कार्यालयाच्यावतीने पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत मतदारसंघात मतदार जागृती करण्यात येत आहे.
SWEEP Programme
SWEEP Programme sakal

हडपसर : हडपसर विधानसभा सहाय्यक निवडणूक कार्यालयाच्यावतीने पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत मतदारसंघात मतदार जागृती करण्यात येत आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप व्यवस्थापन पथकाकडून विविध शाळा, महाविद्यालये, मंडळे, संस्था, बसथांबे आदी सार्वजनिक ठिकाणी ही जागृती केली जात आहे.

मतदारसंघातील कोंढवा बुद्रुक येथील रसिकलाल धारीवाल शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप व्यवस्थापन पथकाकडून पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी आपल्या पालकांना प्रेमाने हट्ट करावा, मतदानाचे महत्व सांगावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले. या वेळी संकल्प पत्राचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

मतदारांना नैतिक मतदानाबाबत उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा, मतदान कसे करावे, निवडणुकीदरम्यान होणाऱ्या भ्रष्ट व्यवहारांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेला मदत कशी करावी, इत्यादी माहितीही यावेळी देण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, पोलिसचौक्या, बसथांबे, रिक्षाथांबे, सोसायट्या, मंडळे, संस्था, बँका, टपालकार्यालये, क्रीडा मैदाने, आरोग्य केंद्रे, उद्याने, मॉल, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी पथकाकडून मतदार जागृती केली जात आहे.

SWEEP Programme
Pune Loksabha Constituency : राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा

सहाय्यक आयुक्त हेमंत किरुळकर यांनी उपक्रमाचे संयोजन केले. मुख्याध्यापिका स्वाती बाहुलेकर, शिक्षिका पद्मजा जगताप, आरती काळे, विठ्ठल म्हेत्रे, स्वीप समन्वयक अमरदीप मगदूम, सहाय्यक संजीव परदेशी, पंकज पालाकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युन्म गिरी आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com