कोरोनाला हरवायचंय मग, आहाराकडे लक्ष द्या !

Want To fight against corona then pay attention to diet
Want To fight against corona then pay attention to diet

पुणे ः कोरोनाला हरवायचे असेल तर दीर्घकाळ त्याच्याशी दोन हात करायची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. यासाठी उत्तम प्रतिकारशक्ती असणे केंव्हाही चांगलेच. म्हणूनच योग्य आहाराबरोबरच नियमित व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्‍टरांसह जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आपण लॉकडाउनचे पालन करत आहोत. जीवनशैलीमध्ये अचानक झालेला हा बदल, नागरिकांच्या रोजच्या जगण्याबरोबरच आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करत आहे. महामारीच्या काळात लोकांची प्रतिकारशक्ती चांगली राहणे गरजेचे आहे. जेणेकरून इतर आजारांनाही ते आपल्यापासून दूर ठेवू शकतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ वैज्ञानिक ज्योती शर्मा म्हणाल्या,""घरातील एकटेपणा, शारीरिक अंतराचे पालन, माहितीचा अभाव, भीतीदायक वातावरण, ताणतणाव, घटलेल्या शारीरिक हालचाली अशा कारणांमुळे लोकांना अनावश्‍यक आजारही जडत आहे. कोविड-19साठी अजूनही प्रभावी उपचार पद्धती, औषधे आणि लस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली अवलंबण्याचा सल्ला सरकारच्या वतीने दिला आहे.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे लोकांवर झालेले परिणाम :
अनावश्‍यक भीती, चिंताग्रस्त, चिडचिड, अपराधी असल्याची भावना, अनास्था, निद्रानाश, वजन वाढणे किवा कमी होणे, लक्ष न लागणे, हृदयाशी आणि जीवनशैलीशी निगडित आजार. 

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले

आहाराचा प्रतिकारशक्तीशी थेट संबंध : 
- जीवनशैली आणि शरिरासाठी आहाराची औषधासारखी भूमिका 
- शरीराचे तापमान, भौतिकस्थिती आणि मानसिकस्वास्थ्य आहाराशी निगडित 
- शरीराला आवश्‍यक जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके आदी पोषणमूल्ये चांगल्या आहारातून मिळते 
- रोगाविरुद्धची प्रतिकारशक्ती आहारातील घटकांतून प्राप्त होते 
- आजाराला शरिरापासून लांब ठेवण्याची ताकद उत्तम आहारात 

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

कोरोनासाठी आवश्‍यक आहारशैली : 
देशातील लोकांची आहाराची पद्धत आणि उपलब्धतेनुसार आहारशास्त्रज्ञ डॉ. एस.के. वर्षनी आणि ज्योती शर्मा यांनी आहारासंबंधी तयार केली सूची.. 

1) यांचा समावेश असावा :
- तंतुमय पालेभाज्या आणि फळे (व्हिटॅमिन अ, क आणि इ) 
- डाळी, पूर्ण धान्य(गहू, तांदूळ, बाजरी, आदी), कडधान्य 
- कमी चरबी (फॅट) असलेले दुधाचे खाद्यपदार्थ 
- मीठ न लावलेल्या बिया, शेंगदाणे (सूर्यफूल, कोहळा आदी) 
- अंड्याचा बलक 
- अनसॅचूरेटेड फॅट किंवा तेल (सोयाबीन, शेंगदाणा) 
- फळांचा रस, लिंबू पाणी, आयुर्वेदिक चहा 
- मध आणि गूळ 
- मसाले : धणे, हळद, मेथी, तुळस, जीरा, खडे मीठ 


2) यांचा वापर कमी करा  :
- कमी मसालेदार आणि जास्त तेलाचे पदार्थ 
- बिगर हंगामी आहार 
- ब्राऊन ब्रेड 
- जास्त साखरेचे पदार्थ 
- सॉफ्ट ड्रिंक 
- ब्राऊन शुगर 


3) हे टाळाच :
- जास्त तळलेले, शिजलेले आणि मसालेदार खाद्यपदार्थ 
- जास्त प्रक्रिया केलेले अन्न 
- जास्त खारट आणि गोड असलेले खाद्यपदार्थ 
- फास्ट फूड 
- आयोडीन नसलेले मीठ 


पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजाराच्या उंबरठ्यावर'; पुढील 15 दिवसांमध्ये होणार दुप्पट

आयुष मंत्रालयाचा काढा 
शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेदिक काढा पिण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहे. तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, मनुका यांचा योग्य प्रमाणातील काढा किंवा ताज्या लिंबाच्या रसासोबत घ्यावे असे आयुषने सांगितले आहे. 

"कोरोनाच्या काळात मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. उत्तम आहाराबरोबरच इतर पूरक जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. व्यायाम आणि योगाही करावा. या काळात अनारोग्य बळावू नये म्हणून वैयक्तिक पातळीवर काळजी घ्यावी.'' 
- डॉ. एस.के. वर्षनी, विभागप्रमुख, इंटरनॅशनल बायलॅट्रल कोऑपरेशन डिव्हिजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, केंद्र सरकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com