भारतातील महाविद्यालयात प्रवेश द्या; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची मागणी

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेले विद्यार्थी भारतात परतले
ukrain medical student in india
ukrain medical student in indiasakal

भोसरी : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विद्यार्थी भारतात परतले आहेत. युक्रेनमधील विद्यापीठांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवल्याने भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही भारताने येथील वैद्यकीय महाविद्यालयात समावेश करून घेण्याच्या मागणीसह भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची फी कमी केल्यास आम्हाला भारतातच शिक्षण घेणेही शक्य होईल असे विचार विद्यार्थ्यांनी मांडले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेले विद्यार्थी भारतात परतले. मात्र युद्ध सुरू असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भिती विद्यार्थ्यांना होती. मात्र युक्रेनमधील विद्यापिठांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या शिक्षकांना शेजारील देशात पाठवून त्या ठिकाणाहून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे सुरू असलेले हे युद्ध लवकरात लवकर थांबवले जाणे गरजेचे असल्याचे मतही काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

निगडीमध्ये राहणारा आणि एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेणारा श्रीनाथ मच्छिंद्र साठे हा विद्यार्थी सांगतो, की युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर २३ फेब्रुवारी रोजी भारतात परतलो. शिक्षण सुरू राहील की नाही याची शंका होती. मात्र मी शिक्षण घेत असलेल्या विद्यापिठाने २१ मार्चपासून आॅनलाईन शिक्षणास सुरवात केल्याने दिलासा मिळाला आहे. तरीही युद्ध सुरूच राहिल्यास शिक्षण सुरू राहील की नाही याची शंका आहे.

तर खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे राहणारा सूरज संजय वहिले याने सांगितले की, भारतातील वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांनी फी कमी केल्यास आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना भारतातच शिक्षण घेणे शक्य होईल. कोरोना लॅाकडाऊनमध्येही आॅनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे आता आॅनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत नाहीत. युद्ध संपल्यावर पुन्हा शिक्षणासठी युक्रेनला जाईन.

चिंचवडमध्ये राहणारा प्रियांशू राजगौंडा चौगुले म्हणाला, "युक्रेनमधील नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू होते. ते १५ जून पर्यंत चालते. मी युक्रेनमधील शिक्षण घेत असलेल्या वैद्यकीय विद्यापिठाने १५ जूनपूर्वी अभ्यासक्रम संपवणार असल्याची खात्री दिली आहे. १५ जून ते आॅगस्ट अखेर तेथे शाळा, विद्यापिठांना सुट्ट्या दिल्या जातात."

जुन्या सांगवीत राहणारी गायत्री विजयकुमार पोरे हिने सांगितले की, १२ मार्चपासून दररोज आमचा चार तास आॅनलाईन क्लास सुरू आहे. मात्र दिल्ली आणि कर्नाटक राज्यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना तेथील वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केल्याचे कळत आहे. महाराष्ट्र शासनानेही आमचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात सामावेश करून घ्यावा.

विद्यार्थ्यांच्या मागण्या...

  • -शासनाने वैद्यकीय फी कमी करावी.

  • -वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवावी.

  • -युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घ्यावे.

  • -वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत द्यावी.

  • युक्रेनमधून शहर परिसरात आलेले विद्यार्थी

  • शहराचे नाव विद्यार्थ्यांची संख्या

  • भोसरी ४

  • मोशी ४

  • चऱ्होली / वडमुखवाडी २

  • चिंचवड ८

  • सांगवी ३

  • निगडी ४

  • चिखली २

  • आकुर्डी २

  • काळेवाडी / रहाटणी २

  • चाकण / वाकी खुर्द ३

  • एकूण ३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com