चास कमान धरणाच्या पाणसाठ्यात होतेय कासवगतीने वाढ

चास-कमान धरण (ता. खेड) - पाणीसाठा 13.49 टक्के (1.02 टीएमसी) टक्यावर पोहोचला आहे.
चास-कमान धरण (ता. खेड) - पाणीसाठा 13.49 टक्के (1.02 टीएमसी) टक्यावर पोहोचला आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होण्यास सुरूवात झाली असून चास-कमान धरणातील पाणीसाठा 13.49 टक्के (1.02 टीएमसी) टक्यावर पोहोचला असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे, मागील वर्षी पंधरा जुलै रोजी धरणात तब्बल 45.23 टक्के पाणीसाठा झाला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चालू वर्षी पावसाने दमदारपणे वेळेत आगमन केलेल्या समाधानकारक पावसाने बळिराजा सुखावला होता मात्र त्या नंतर पावसाने दडी मारली व तमाम शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. खेड तालुक्यासह शिरूर तालुक्यातील जनता व प्रामुख्याने बळीराजा ज्यावर लक्ष ठेवून असते ते म्हणजे चास-कमान धरण, चास कमान धरण भरले म्हणजे संपूर्ण वर्षाचे शेतीचे गणीत जुळले जाते, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे नियोजन होत असल्याने चास-कमान धरण भरण्याची प्रतीक्षा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसह तमाम नागरिकांना असते.

भिमा नदिवर असणाऱ्या चास-कमान धरणाची पाणीक्षमता 8.53 टीएमसी. असून सद्य स्थितीत धरणांमध्ये 13.49 टक्के (1.02 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा 45.23 टक्के झाला असल्याने मागील वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल 31.74 टक्यांनी पाणीसाठा कमी आहे. गेली जवळपास 24 दिवसांपासून पावसाने दिर्घकाळ विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढहि कासवगतीप्रमाणे मंदावली आहे. चास कमान धरण परिसरात एक जुनपासून 259 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com