उजनीतून सोडले भीमा नदीत पाणी; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

डॉ. संदेश शहा
Wednesday, 14 October 2020

पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणातून दि. १३ ऑक्टोबर रोजी दिवसभर विक्रमी म्हणजे ३४.१५ टीएमसी पाणी सोडण्यात आले.

इंदापूर : पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणातून दि. १३ ऑक्टोबर रोजी दिवसभर विक्रमी म्हणजे ३४.१५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यासाठी उजनी धरणाच्या ४१ पैकी १६ दरवाजे ०.२६ मीटरने उचलून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

उजनी धरणाच्या पुणे जिल्हा लाभक्षेत्रातील १९ धरण १०० टक्के भरल्याने उजनी धरण संपूर्ण क्षमतेने भरले होते. त्यातच धरण कार्यक्षेत्रात दि. १३ ऑक्टोबर रोजी ७४ मिलीमीटर इतका पाऊस पडल्याने धरणातून पाणी भीमा नदीत सोडावे लागले. उजनी धरणाची दुपारी १२ वाजेपर्यंत ४९७.३३० मीटर इतकी पाणी पातळी होती. धरणात एकूण पाणीसाठा १२३.२८ टीएमसी तर उपयुक्त पाणी साठा ५९.६२ टीएमसी होता. धरणात १११.२८ टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

त्यानुसार दुपारी १२ वाजता वीज निर्मितीसाठी १६०० क्यूसेक, भीमा नदीत १५ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. दरम्यान पुणे बंडगार्डन येथून ३८१९ तर दौंड मधून ४१९९ क्यूसेक पाणी भीमा नदीत येऊ लागल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली. त्यामुळे धरणातून एक वाजता २० हजार, सव्वातीन वाजता ४० हजार, चार वाजता ५० हजार, साडेचार वाजता ६० हजार क्यूसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले.

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

वीर धरण १०० टक्के भरल्याने धरणातून निरा नदीत१३९११क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील निरा भीमा नदी संगमावर ३३३१९ क्यूसेक पाणी विसर्ग चालू असून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी जलसंपदा विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water released from Ujani dam into Bhima river