Pune Rain : पुणे-नाशिक महामार्गावर वाकी गावात पाणीच पाणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

महामार्गावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने पहाटे पाच पर्यंत वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती.ओढा काही लोकांनी बुजविल्याने तसेच वळविल्याने हा गेल्या तीन वर्षांपासून हा प्रश्न उदभवला आहे,पण महसूल प्रशासन,टोल आकारणारी रस्ते कंपनी काहीच करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे.

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री दोन ते पहाटे तीनच्या दरम्यान वाकी खुर्द, ता.खेड गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पुरासारखे पाणी वाहत होते. अरुंद झालेल्या ओढ्यात पाणी मोठया प्रमाणात ओसंडून वाहिल्या ने  पुरासारखे पाणी वाहत होते.

महामार्गावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने पहाटे पाच पर्यंत वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती.ओढा काही लोकांनी बुजविल्याने तसेच वळविल्याने हा गेल्या तीन वर्षांपासून हा प्रश्न उदभवला आहे,पण महसूल प्रशासन, टोल आकारणारी रस्ते कंपनी काहीच करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे.

Video:पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहत होतं पाणी; रात्री उशिरा पावसाची विश्रांती

काल सायंकाळ पासून पाऊस सुरू झाला त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पावसाचा जोर वाढला त्यानंतर पाणी ओढ्याला वाहू लागले. वाकी खुर्द गावच्या जवळील ओढा काही व्यवसायिक, प्लॉट विक्रेते यांनी त्यांच्या फायद्यासाठी बुजविला, तो वळविला, काही ठिकाणी सिमेंटी पाईप टाकले. त्यामुळे ओढ्याला पात्रच राहिले नाही. वाकीच्या पश्चिम बाजूच्या डोंगर उतारावरून तसेच शेतातून येणारे पाणी गावाजवळील महामार्गावरील ओढयात येते, पण ओढा अरुंद झाल्याने पुराचे पाणी महामार्गावर आले आणि दोन तास चक्क महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पाणी ओसरल्यावर वाहतूक पहाटे पाच नंतर सुरळीत झाली. हे पाणी शेजारील काही घरात, एका मॉलमध्ये तसेच जनावरांच्या गोठ्यात घुसले. जनावरांना त्याच पाण्यात रात्रभर उभे राहावे लागले. घरांत, गोठ्यात व मॉलमध्ये पाणी घुसल्याने  आर्थिक नुकसान झाल्याचे रुपेश जाधव यांनी सांगितले.

Breaking : मुसळधार पावसाचा फटका; पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले 
 

प्रशासन ठप्प का?
गेल्या तीन वर्षांपासून महामार्गावर पाणी येत आहे,वाहतूक ठप्प होत आहे,ओढा काही लोकांनी बुजविला आहे. पण, याकडे महसूल प्रशासन, रस्ते कंपनी अजिबात लक्ष देत नाही. ज्यांनी ओढा बुजविला, दुसरीकडे वळविला त्यांच्याकडून  काही लोकांनी आर्थिक सेटलमेंट केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे असा नागरिकांचा आरोप आहे.
 

आणखी बातम्या वाचा 
मुसळधार पावसाने उडवली, पुणेकरांची झोप

पुण्यात रात्री काय घडलं? पाहा फोटो फिचर

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in Waki ​​village on Pune-Nashik highway due to heavy rain fall