साखरेचा विषय येताच जयंत पाटलांकडे बोट - चंद्रकांत पाटील

Chandrakant-Patil
Chandrakant-Patil

पुणे - ‘एकर आणि हेक्‍टरमधील फरक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळत नाही. साखरेचा विषय येताच ते जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवतात. तर महसूलबाबत, बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहतात. मग, त्यांना कशातले कळते? अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. ‘‘वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’’ असे विचारून पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची खिल्लीही उडविली.

पुण्यातील प्रश्‍नांबाबत पाटील यांनी महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, ‘‘लोकांचे प्रश्‍न सोडवायचे तर कोणते खाते कोणाकडे? हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांना कळेनासे झाले आहे. हे सरकार निर्णय घेत नसून, केवळ सहा मंत्र्यांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय बेकायदा आहेत.’’

गृहखात्याचे विधान हास्यास्पद
गृहखाते घ्यायला कोणी तयार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत आहेत. पवार हे हास्यास्पद बोलत आहेत. गृहखाते नको असेल तर ते शिवसेनेला द्यावे, असा चिमटा त्यांनी पवार यांना काढला. 

‘अपात्र व्यक्तींना कर्जमाफी नको’
‘शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये अपात्र व्यक्तींचे नाव आल्यास अथवा चुकीचे काम करणाऱ्याची गय केली जाणार नाही. मग ती मंत्र्यांची अथवा कोणत्याही नेत्यांची बॅंक असो,’’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतकरी कर्जमाफी योजनेचा आढावा घेतला. या वेळी अजित पवार यांनी हा इशारा दिला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘शेतकऱ्यांबद्दल सरकार संवेदनशील आहे. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी कर्जमाफी योजनेमध्ये वैयक्तिक लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर या योजनेचा आढावा घ्यावा. आपण सर्व जण मिळून चांगले काम करू.’’

तर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा सहकारी बॅंकानी यादी नीट करावी. कर्जमाफीच्या यादीमध्ये अपात्र व्यक्तींची नावे घुसवू नयेत. तसेच केल्यास त्या बॅंक अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, कारवाई करण्यात येईल. यामध्ये गैरप्रकार होता कामा नये. झाला तर खपवून घेतला जाणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com