esakal | लॉकडाउनमध्ये हार्ट ॲटॅक गेला कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

Heart-Attack

कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये हृदय विकाराच्या धक्‍क्‍यांचं (हार्ट ॲटॅक) प्रमाण अचानक कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात रोजच्या रोज होणाऱ्या शेकडो अँजिओप्लास्टींची संख्या एकाएकी खाली आली आहे. मग, लॉकडाउनमध्ये हे सगळे हार्ट ॲटॅकचे रुग्ण गेले कुठे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? हृदयविकार तज्ज्ञांनाही तो पडला आहे. त्याचे शास्त्रीय उत्तर शोधण्यासाठी पुण्यात आता संशोधन सुरू झाले आहे.

लॉकडाउनमध्ये हार्ट ॲटॅक गेला कुठे?

sakal_logo
By
योगिराज प्रभुणे

रुग्णांची संख्या कमी झाल्याबाबत ‘सीएसआय’कडून संशोधन सुरू 
पुणे - कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये हृदय विकाराच्या धक्‍क्‍यांचं (हार्ट ॲटॅक) प्रमाण अचानक कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात रोजच्या रोज होणाऱ्या शेकडो अँजिओप्लास्टींची संख्या एकाएकी खाली आली आहे. मग, लॉकडाउनमध्ये हे सगळे हार्ट ॲटॅकचे रुग्ण गेले कुठे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? हृदयविकार तज्ज्ञांनाही तो पडला आहे. त्याचे शास्त्रीय उत्तर शोधण्यासाठी पुण्यात आता संशोधन सुरू झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक हृदयविकार दिन येत्या मंगळवारी (ता. 29) आहे. लॉकडाउनमध्ये पुण्यातील हार्ट ॲटॅकच्या रुग्णांची संख्या कमी का झाली, यात नेमकं काय घडलं, याचं संशोधन देशात ‘कार्डिओलॉजिस्ट सोसायटी आँफ इंडिया’ (सीएसआय) करत आहे. या संशोधनात ‘सीएसआय'च्या पुणे शाखेचेही योगदान आहे. 

आधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार

'सीएसआय"च्या पुणे शाखेचे अध्यक्ष हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजीव सेठ म्हणाले, 'लॉकडाउनमध्ये हृदयविकाराचे कमी झालेले प्रमाण हा जगभरातील कल दिसतो. युरोपियन हार्ट जर्नल आणि अमेरिकन हार्ट जर्नलमध्येही कमी झालेल्या संख्येचे विश्‍लेषण केले आहे. आपल्याकडेही राष्ट्रीय पातळीवर संशोधन सुरू आहे. त्यात गेल्या वर्षीच्या मार्च ते जूनचा तुलनात्मक अभ्यास यंदाच्या लॉकडाउनमधील महिन्यांशी करण्यात येत आहे. त्याची माहिती संकलित करण्याची प्रकिया सुरू आहे. या संशोधनात पुण्याचाही सहभाग आहे.'

स्वारगेट परिसरात प्रवाशाचा खून करणाऱ्यास अटक

'सीएसआय'च्या पुणे शाखेचे सचिव डॉ. राहुल पाटील म्हणाले, 'देशातील पाच हजारांहून अधिक रुग्णालयांमधून संशोधनासाठी माहिती संकलित करण्यात येत आहे. रुग्णालयात येणाऱ्या 80 टक्के रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. इतर देशांप्रमाणेच आपल्याकडील हृदयविकाराचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पुण्यातील पाच रुग्णालयांमधून या बाबतचा अभ्यास अद्याप सुरू आहे. त्याचे अंतिम निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध केला जाईल.'' 

हृदयविकार कमी झाल्याची प्रथमदर्शनी कारणे... 

  • लॉकडाउनमध्ये सर्वजण घरातच होते. त्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले 
  • झोपेच्या आणि जेवण्याच्या वेळा निश्‍चित होत्या 
  • बाहेरील खाद्यपदार्थाचे प्रमाण कमी होते 
  • प्रदूषणाची पातळी कमी झाली होती 
  • ताणतणाव नव्हता

हार्ट ऍटॅक येण्यामागे रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि धूम्रपान ही प्रमुख कारणे असल्याचे आतापर्यंत म्हटले जात होते. या सोबतच ताणतणाव आणि प्रदूषण हे दोन मोठे घटक आहेत, हे प्रथमदर्शनी संशोधनातून पुढे येते. मात्र, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल असे इतर आजार असतानाही लॉकडाउनमध्ये हार्ट ऍटॅकचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे.  
- डॉ. राहुल पाटील, हृदयरोग तज्ज्ञ

Edited By - Prashant Patil

loading image