
पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्यासमोर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं अमावस्येच्या रात्री बंगल्याच्या गेटजवळ आणि गाडीसमोर नारळ, दहीभात, उकडलेले अंडी, लिंबू ठेवल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलंय. गेल्या चार महिन्यांपासून धनकवडी परिसरात हा प्रकार सुरू होता. शनिवारी रात्री धनकवडी परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर काळी जादू केल्याचा प्रकार उघडकीस आला.