esakal | दोन वर्षाच्या मुलासह महिलेची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेची आत्महत्या

दोन वर्षाच्या मुलासह महिलेची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे तीस वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी

कविता देविदास भोसले (वय ३०, रा. भेकराईनगर, मूळगाव उमरगा जि. उस्मानाबाद) व प्रणीत देविदास भोसले (वय २) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता भोसले या मागील दोन दिवसांपासून आपल्या दोन वर्षांच्या मुलासह बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात कविता बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

हेही वाचा: शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या

त्यानुसार हडपसर पोलीस कविताचा शोध घेत असताना कविताच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे आळंदी म्हातोबा या ठिकाणी दाखवत असल्याचे तपासा दरम्यान समजले. त्यानुसार लोणी काळभोर व हडपसर पोलिसांनी आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत हद्दीत तपास सुरू केला असता त्यांना गायकवाड वस्ती येथे असलेल्या एका विहिरीत महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा कविता व तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा होता.

loading image
go to top