पुणेकर भगिनींनो तयार राहा; पहिलं ‘वुमेन बजेट’ येतंय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

योजना ४० कोटींच्या, खर्च चारच कोटी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी समाज विकास विभागाकडे आहे. दरवर्षी जवळपास ४० कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. मात्र गेल्या आठ महिन्यांत केवळ चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. लाभार्थी न मिळाल्याने योजना अमलात आल्या नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे नव्या स्वरूपातील योजना आणण्याचा प्रयोग करीत आहोत, असे समितीच्या सदस्या स्वप्नाली सायकर यांनी सांगितले.

पुणे - गरीब, गरजू महिलांकरिता स्वतंत्र हॉस्पिटल, ‘वर्किग वुमेन’साठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था, ‘आयटी’तील तरुणींना ‘इन्क्‍युबेशन सेंटर’, विद्यार्थिनींना शाळांत ‘ई-टॉयलेट’ अशा नव्या योजनांचा समावेश असलेले महापालिकेचे पहिलेवहिले ‘वुमेन बॅजेट’ यंदा सादर होणार आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या बहुतांशी सोयीसुविधा ‘सीएसआर’अंतर्गत उभारण्यात येणार आहेत. महापालिकेचा महिला व बालकल्याण समिती स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिला सक्षमीकरणाच्या नावाने वर्षानुवर्षे जाहीर केल्या जाणाऱ्या, मात्र अंमलबजावणीत शून्य राहिलेल्या महिलांकरिताच्या योजना बाजूला करीत हा अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पानंतर पुढच्या दहा दिवसांत स्थायी समितीला ‘वुमेन बजेट’ सादर केले जाईल. 

पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड येत्या सोमवारी (ता. २७) २०२०-२१ अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे ठेवणार आहेत. पुणेकरांचे प्राधान्य, उत्पन्न, प्रकल्प उभारणीची महापालिकेची क्षमता या बाबींचा विचार करून अर्थसंकल्प मांडण्याचे नियोजन केले आहे. अर्थसंकल्पांची अंमलबजावणी होत नसल्याची ओरड असतानाच महिलांच्या जुन्या मात्र नावापुरत्या योजना पूर्णपणे बंद करून या घटकाची नेमकी गरज ओळखून स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 

'राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा' 

समितीच्या सदस्य मनीषा लडकत म्हणाल्या, ‘‘गरजू आणि योजनांचे स्वरुप यात तफावत असल्याने त्या अमलात येत नाहीत. त्यावरचा निधी खर्ची पडत नसल्याने योजनांचा उद्देश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women budget for women by pune municipal