पुणे मेट्रो...अजित पवार...अन् सद्य परिस्थिती...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

शिवाजीनगर न्यायालय ते शेवाळवाडीपर्यंत मेट्रो मार्गाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) दिल्ली मेट्रोला देण्यात आले आहे. परंतु लॉकडाउन शिथिल झाला असला, तरी या मार्गावरील ट्रॉफिक अद्याप सुरळीत न झाल्यामुळे सर्व्हेक्षणाचे काम अडले आहे.

पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते शेवाळवाडीपर्यंत मेट्रो मार्गाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) दिल्ली मेट्रोला देण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊन शिथिल झाला असला, तरी या मार्गावरील ट्रॉफिक अद्याप सुरळीत न झाल्यामुळे सर्व्हेक्षणाचे काम अडले आहे. पुढील महिन्यात सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात येईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. 

पन्नास जणांच्या उपस्थितीत आषाढी पालखी प्रस्थान सोहळा

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर- हडपसर -फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी मार्च महिन्यात मुंबई येथे पीएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांचा आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत "शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डन पर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग शेवाळवाडीपर्यंत वाढविण्यात यावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतच्या सादर केलेल्या अहवाल सुधारीत करून तो तातडीने सादर करावा,' अशा सूचना पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानूसार शिवाजीनगर ते शेवाळवाडी असा मेट्रो मार्गाचे सुधारीत सर्व्हेक्षण करण्याचे काम पीएमआरडीएने नुकतेच दिल्ली मेट्रोला दिले आहे. 

शिवराज्याभिषेक दिन ऑनलाइन; ३२ देशांतील मराठी बांधव सहभागी

परंतु 23 मार्चपासून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे सर्व कामे बंद होती. लॉकडाउन राज्य सरकारने शिथिल केला असला, तरी अद्याप शहरातील व्यवहार आणि वाहतूक सुरळीत झालेली नाही. या नवीन मार्गाचे सर्व्हेक्षणात ट्रॉफिक सर्व्हे महत्वाचा भाग आहे. या मार्गावर सध्या फारशी वाहतूक नसल्यामुळे हे काम थांबले आहे. परंतु पुढील महिन्यात सर्व्हेक्षणाचे काम सुरू होईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

शिवाजीनगर न्यायालयात ते फुरसुंगी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम पीएमआरडीने दिल्ली मेट्रोला दिले होते. दिल्ली मेट्रोने या मार्गाचे सर्व्हेक्षण करून मध्यंतरी प्राधिकरणाकडे यासंदर्भातील अहवाल दिला आहे. त्यामध्ये 15.53 किलोमीटर लांबीचा हा मार्ग दर्शविण्यात आला आहे. परंतु तो पुन्हा शेवाळवाडीपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्यामध्ये नव्याने सुमारे चार किलोमीटर अंतराची भर पडणार आहे. त्यामुळे हा मार्ग आता वीस किलोमीटर लांबीचा होणार आहे.

बारामतीच्या नवीन वाहतूक आराखड्याला हिरवा कंदिल

हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगर ते शेवाळवाडी वीस किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होणार आहे. त्यामुळे आता हिंजवडी ते शेवाळवाडी असा मेट्रो सुमारे 43 किलो मीटर लांबीचा मेट्रो मार्ग होणार आहे. या संपूर्ण मार्गावरून 57 मेट्रोच्या कार धावण्याचे नियोजन असणार आहे. 

शिवाजीनगर (कोर्ट)- रेल्वे कॉलनी- कलेक्‍टर ऑफिस, एमजी रोड- फॅशन स्ट्रीट - मंमादेवी चौक - रेसकोर्स - काळूबाई चौक - वैदवाडी- हडपसर फाटा - हडपसर बस डेपो - ग्लाईडींग सेंटर- फुरसुंगी आयटी पार्क- सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून शेवाळवाडीपर्यंत नेण्यात येणार असून, त्या मार्गाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on Pune metro project stalled