esakal | टिळेकरांनी विकासकामातून हडपसरला न्याय दिला- खासदार बापट
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Tilakar developed hadapsar area says girish bapat

काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने हडपसरवर नेहमीच अन्याय केला होता. टिळेकरांनी केलेल्या विकासकामातून न्याय दिला गेला आहे. त्यांच्या या कामाबरोबरच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्याने गेल्या वेळेपेक्षाही मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. 

टिळेकरांनी विकासकामातून हडपसरला न्याय दिला- खासदार बापट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे-मांजरी : शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत हडपसर मतदार संघासाठी सर्वाधिक विकासनिधी मिळवणारा आमदार म्हणून योगेश टिळेकर यांची ओळख आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने हडपसरवर नेहमीच अन्याय केला होता. टिळेकरांनी केलेल्या विकासकामातून न्याय दिला गेला आहे. त्यांच्या या कामाबरोबरच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्याने गेल्या वेळेपेक्षाही मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. 

मतदार विकाससाठी पुन्हा संधी देतील- योगेश टिळेकर

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ महंमदवाडी रस्त्यावरील ससाने लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार बापट बोलत होते. 

टिळेकरांच्या प्रचारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, नगरसेवक मारुती तुपे, संगीता ठोसर, प्रमोद भानगिरे, संजय घुले, रंजना टिळेकर, प्राची अल्हाट, उमेश गायकवाड, वृषाली कामठे, शिवसेनेचे हडपसर प्रमुख तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, आप्पासाहेब गायकवाड, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विराज तुपे, संगीता आठवले, वीरसेन जगताप, मनिषा कदम, संतोष खरात शिवसेना विभाग प्रमुख गणेश कामठे, अभिजित बोराटे, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र भंडारी, हज समितीचे संचालक इम्रान मुजावर, निवडणूक समन्वयक रवी तुपे, संदीप दळवी, संजय सातव, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, अमित घुले यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

योगेश टिळेकरांना मताधिक्य देण्याचा मुस्लिम बांधवाचा निश्चय

काँग्रेसच्या माजी नगरसेविका विजया वाडकर व मांजरीच्या ग्रामपंचायत सदस्य निर्मला म्हस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला खासदार बापट यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.