पुण्यात खंडणीसाठी केले युवकाचे अपहरण अन् संपविले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

अब्दुलआहाद याचे शनिवारी रात्री आठच्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. तसेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी अब्दुलआहाद याच्या नातेवाईकांना फोन करून चाळीस लाखांच्या खडणीची मागणी केली.

पिंपरी : चाळीस लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.12) पहाटे उघडकीस आली. अब्दुलाआहाद सय्यद सिद्दीकी (वय 18 रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

कुठे आग लागो, की घरे-झोपड्यांत पुराचे पाणी शिरो... आम्ही बाह्या सरसावून पुढे
 

अब्दुलआहाद याचे शनिवारी रात्री आठच्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. तसेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी अब्दुलआहाद याच्या नातेवाईकांना फोन करून चाळीस लाखांच्या खडणीची मागणी केली. त्यावेळी अपहरणाची बाब उघडकीस आली. याबाबत नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच!

दरम्यान, अब्दुलआहाद  याचा मृतदेह रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवरात सापडला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy Kidnapped and murdered for ransom Pimpri Pune