धक्कादायक, जुन्नरमधील तरुण माजी सरपंचांचा कोरोनाने मृत्यू

dead_body
dead_body

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील 27 वर्षे वय असलेल्या एका तरुण माजी सरपचांचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता चार झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

संबंधित माजी सरपंचांना सात जुलै रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर नारायणगाव येथील मेडिकल दुकानात काम करत असलेल्या त्यांच्या वडिलांना कोरोना झाल्याचे आठ जुलै रोजी निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले व मेडिकल दुकानात काम करत असलेल्या 25 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी चौदा जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे काल निष्पन्न झाले. 

नारायणगाव आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या नारायणगाव, वारुळवाडी, धनगरवाडी, धालेवाडी, आर्वी, हिवरे बुद्रुक परिसरात मागील वीस दिवसांत ५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एक महिन्यापूर्वी धनगरवाडी येथे मुंबई येथून आलेला पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर धनगरवाडी येथे १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. विवाह कार्यक्रमातून संपर्कात आल्याने धालेवाडी व हिवरे बुद्रुक या लहान गावातील वीस जणांना कोरोनाची बाधा झाली. नारायणगाव येथील एक सलून व्यवसायिक व त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे संबंधित सलून व्यवसायिकाने घरी जाऊन ज्यांना सेवा दिली, त्यांचा शोध सुरू आहे. नारायणगाव, वारुळवाडी, धनगरवाडी, धालेवाडी, आर्वी, हिवरे बुद्रुक परिसरात मागील महिनाभरात एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी या गावात १४ जुलैपासून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आमदार बेनके यांच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोना 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आमदार अतुल बेनके हे मार्च महिन्यापासून सातत्याने नागरिक व शासकीय अधिकारी यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते नकळत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. सुदैवाने त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, विषाणूजन्य आजारांची लक्षणे असल्याने ते ८ जुलैपासून होम क्वारंटाइन आहेत. परंतु, त्यांच्या सोबतचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आमदार बेनके व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चिंता वाढली आहे.
     
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com