पोटासाठी त्यांना व्हावे लागतेय व्यसनाधीन 

Hukka-Parlour
Hukka-Parlour

पार्लरमध्ये हुक्का पेटवून देणाऱ्या तरुणांची शोकांतिका 
पुणे - शहरातील उच्चभ्रू समाजातील युवक मौजमजा, चैन करण्यासाठी हुक्का पार्लरमध्ये येऊन व्यसन करतात. दुसऱ्या बाजूला पार्लरमधील हुक्का पेटवून देण्याचे काम करणारे अवघ्या विशीतील युवक कधी व्यसनाच्या आहारी जातात, हे त्यांनासुद्धा कळत नाही. ही खरी समाजातील शोकांतिका असल्याचे दिसून येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क असो की शहरातील कोणत्याही उच्चभ्रू ठिकाणच्या हॉटेल्समध्ये वेटरचे काम करणारी मुले हुक्का पेटविण्याचे काम करतात. हुक्का चांगला पेटण्यासाठी ही मुले आधी स्वत: हुक्का ओढतात. पार्लरमध्ये अनेकजण शौक किंवा व्यसनामुळे हुक्का ओढण्यासाठी येतात. अशा डझनभर ग्राहकांचे हुक्के पेटविण्यासाठी त्यांना रात्रभर हुक्क्याचे झुरके ओढावे लागतात. त्यामुळे ते नकळत व्यसनाच्या आहारी जातात. या व्यसनाधीनतेमुळे त्यांचे गाल आत तर डोळे खोलवर गेलेले दिसतात.

हुक्क्यासाठी लागणारे कोळशाचे पेटते निखारे देणे, ग्राहकाला हुक्का ओढताना किक बसली नाही की पुन्हा दुसरा हुक्का आणून देणे. तो हुक्का चांगला व्हावा म्हणून भराभर हुक्क्याचे झुरके घेणे त्यांचे रात्रभर सुरू असते. श्रीमंत कुटुंबातील व्यसनाधीन तरूणाला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून, त्यांना व्यसनमुक्त करणे शक्य असते. मात्र कुटुंबाचा आधार असलेल्या या गरीब तरूणांचे भवितव्य काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. अशा मुलांना व्यसनामुळे इतर आजार ओढवल्यास त्यांना कामावरून काढून टाकले जाते. अशा असंख्य युवकांचे पुढे काय होते, असा प्रश्‍न पडतो.

कंपनीत हाऊस किपिंगचे काम करत होता. लॉकडाउनमुळे काम गेले. त्यामुळे पर्याय नव्हता म्हणून हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मात्र आलेल्या ग्राहकांना हुक्का पेटवून द्यावा लागतो. याचे व्यसन झाले आहे. ग्राहकांना हुक्का पेटवता पेटवता, तो ओढत नाही तोपर्यंत बरे वाटत नाही.
- संजय (नाव बदलले आहे) वेटर

हुक्का पेटविणारे तरुण व्यसनाधीन झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात येऊन उपचार घेणे परवडत नाही. अशा मुलांचे भविष्य अंधकारमय असते. सरकारने मोफत व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.  
- अजय दुधाणे, संचालक, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com