

Loan Recovery Must Be Responsible: RBI’s New Rules for Recovery Agents
Sakal
पुरुषोत्तम बेडेकर, ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ
बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीसाठी एजंटचा वापर (बरेचदा गैरवापर) वाढत आहे. वसुलीचे काम बरेचदा कंत्राटी पद्धतीने केले जाते. कर्जवसुलीसाठी हे एजंट कर्जदारांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले आहेत. यामुळे, कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. हे नवे नियम एक जानेवारी २०२७ पासून अंमलात येणार आहेत.