

Bharat Electronics share
sakal
मकरंद विपट- ‘सेबी’ नोंदणीकृत रिसर्च ॲनालिस्ट
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. ही १९५४ मध्ये स्थापन झालेली कंपनी संरक्षण क्षेत्राला इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि प्रणालींचे उत्पादन व पुरवठा करते. नागरी बाजारपेठेतही कंपनीची मर्यादित उपस्थिती आहे. कंपनी भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्रणाली आणि सेवा विकसित करते, ज्यामध्ये रडार आणि अग्नी नियंत्रण प्रणाली, शस्त्र प्रणाली, संप्रेषण, नेटवर्क सेंट्रिक सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आदींचा समावेश आहे. ती २९ स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट चालवते, ज्यामध्ये नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, मानवरहित प्रणाली, शोधक आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा या चार नव्या युनिटचाही समावेश आहे. कंपनी आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि नागरी बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनीने गृहसुरक्षा, स्मार्ट सिटी सोल्यूशन्स, सायबर सुरक्षा, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रांसह नागरी बाजारपेठांसाठी नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करून विविधता आणली आहे.