Toyota पाॅवरलूम कंपनी बनली टोयोटा मोटर्स, आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपनीचा रंजक प्रवास

टोयोटा मोटर्सच्या अलिशान गाड्यांची आज जगभरामध्ये विक्री होत असून ही एक ऑटोमोबाईल Automobile क्षेत्रातील आघाडीची कंपनी असली तरी या कंपनीची सुरुवात आणि प्रवास खूपच खास आहे
प्रवास टोयोटा कंपनीचा
प्रवास टोयोटा कंपनीचाEsakal

टोयोटा मोटर्स ही जपानची ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. जगभरामध्ये टोयोटा मोटर्सच्या Toyota Motors मोठ्या प्रमाणात कारची विक्री होते. टोयोटा मोटर कॉर्परेशनचं मुख्यालय हे जपानमधील टोयोटा शहरामध्ये आहे. Business News in Marathi know how Toyota car company was formed in Japan

टोयोटा मोटर्सच्या अलिशान गाड्यांची आज जगभरामध्ये विक्री होत असून ही एक ऑटोमोबाईल Automobile क्षेत्रातील आघाडीची कंपनी असली तरी या कंपनीची सुरुवात आणि प्रवास खूपच खास आहे.

खरं तर एका पाॅवरलूम कंपनीतून टोयोटा मोटर कंपनी उदयास आली आहे. किइचिरो टोयोडा यांनी १९३७ सालामध्ये टोयोटा मोटर्सची Toyota स्थापना केली. त्यापूर्वी किइचिरो टोयोडा यांच्या वडिलांनी म्हणजेच साकिची टोयाडो यांनी १८९० सालामध्ये लाकडी हँडलूम मशीनची निर्मिती केली होती.

हॅण्डलूम मशीनपासून सुरुवात

साकची यांनी त्यानंतर हँडलूम मशीनमध्ये वेगवेगळे प्रयोग करून विविध पाॅवरलूम मशीन तयार केल्या. यात सर्वात महत्वाचं पाऊल होतं ते म्हणजे ऑटोमॅटीक पाॅवरलूम. त्यानंतर त्यांनी १९२६ मध्ये टोयाडो ऑटोमॅटिक लूम वर्कची स्थापना केली. १९८४ पुढे त्यांचा मुलगा किइचिरो याने देखील वडिलांच्या उद्योगात करियर करण्याचं ठरवलं.

दरम्यान साकची आणि त्यांचा मुलगा किइचिरो यांचे अमेरिका आणि युरोपमध्ये काही दौरे झाले. यावेळी त्यांना ऑटोमेटिव्ह उद्योगाचं आकर्षण निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी १९३३ सालामध्ये ऑटोमोबाईल विभागाची स्थापना केली आणि १९३४ सालामध्ये A-टाइपचं ऑटोमोबाईल इंजिन तयार केलं. याच वर्षी त्यांनी एका कार प्रदर्शनामध्ये G1 ट्रक लॉन्च केला.

हे देखिल वाचा-

प्रवास टोयोटा कंपनीचा
Nitin Gadkari Toyota Camry : गडकरींनी उल्लेख केलेली टोयोटाची गाडी का आहे खास? फ्लेक्स-फ्युएलचा काय होणार फायदा?

टोयोटा मोटर कॉर्पोरेशनची स्थापना

ओटोमेटिव्ह क्षेत्रात पूर्णपणे येण्यासाठी साकची यांनी ऑटोमेटिक लूम पेटंट युरोपमधील प्लॅट ब्रदर्स कंपनीला विकले. या विक्रीच्या व्यवहारातून आलेल्या पैशांमधून त्यांनी टोयोटा मोटर कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. १९३७ सालामध्ये त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात पाऊल टाकलं.

दुसऱ्या महायुद्धावेळी जपान आणि चीनची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी जपानने देशातील ऑटोमोबाईल कंपन्यांना प्रोत्साहन दिलं. यावेळी सुरुवातीला टोयोटा जपानी सेनेसाठी ट्रक बनवत. १९३५ सालामध्ये ट्रक लाँच केल्यानंतर दुसऱ्या वर्षीच साकची यांचा मुलगा किचिरो यांनी कार लॉन्च केली.

टोयोटाची पहिली कार

टोयोटाची पहिला कार ही इतर कार मॉडल्सची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली होती. या कारमधील अनेक पार्टस् हे काही अमेरिकन कारच्या पार्टची कॉपी होते. तर काही पार्ट आणि लूक हे शेवरलेसारखेच होते. एकंदर टोयोटाची पहिला एए कार ही शेवरले सेडानची जवळपास हुबेहुब कॉपी होती.

टोयोडा पासून झाली टोयोटा

१९३६ साली कार लॉन्च केल्यानंतर किइचिरो टोयोडा यांनी ऑटोमोबाईल कंपनीचं स्वतंत्र युनिट आणि ओळख निर्माण करण्यासाठी कंपनीचं नाव टोयोडावरून टोयोटा असं केलं. १९३७ साली त्यांनी ही कंपनी रजिस्टर केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान देशाची आर्थिक स्थिती खालावल्याने टोयोटा कंपनीवरही संकट कोसळलं होतं. मात्र १९५०-५३ कोरियन युद्धावेळी अमेरिकेन सेनेने टोयोटा कंपनीला ५००० वाहनांची मोठी ऑर्डर दिली यामुळे कंपीनला पुन्हा 'अच्छे दिन' आले.

जागतिक स्तरावर विस्तार

१९६० सालामध्ये तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने टोयोटाने जागतिक स्तरावर विस्तार वाढवण्यास सुरुवात केली. १० वर्षात टोयोटाने १० लाख कार जगभरामध्ये निर्यात केल्या. १९९१ सालामध्ये टोयोटाने अमेरिकेमध्ये १ लाख कारची विक्री केली. त्यानंतर लॅटीन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये विस्तार वाढवला.

सुरुवातीला टोयोटा बजेट कारची विक्री करत. मात्र सध्या टोयोटा कंपनी करोडो रुपये किंमत असलेल्या अनेक लक्झरी आणि प्रिमियम कार बनवते.

हे देखिल वाचा-

प्रवास टोयोटा कंपनीचा
कारमधील Air Bags योग्य काम करतात का, कसं ओळखाल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com