Bank Holidays: मार्चमध्ये ‘इतक्या' दिवस बँका राहणार बंद, आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holidays In March: फेब्रुवारी महिना संपत आला आहे. मार्च 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्यांचाही समावेश आहे.
Bank Holidays In March
Bank Holidays In MarchSakal

Bank Holidays In March 2024: फेब्रुवारी महिना संपत आला आहे. मार्च 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्यांचाही समावेश आहे. याशिवाय रविवार, सार्वजनिक सुट्टी आणि काही प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहतील जाणून घेऊया (Bank Holidays In March 2024 Banks Will Be Closed For 14 Days, Check List Here)

मार्च महिन्यात होळीचा सण आहे. 25 मार्चला होळीनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी असेल. देशभरातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांदिवशी सुट्ट्या असतात आणि स्थानिक सणांनुसार बँका बंद राहतात.

Bank Holidays In March
Google Pay: यूजर्सना मोठा झटका! गुगल पे अमेरिकेत होणार बंद; काय आहे कारण?

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमधील सर्व रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 1, 8, 22, 25, 26, 27 आणि 29 मार्च रोजी बँकांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये 5 रविवार येतात म्हणजेच 3, 10, 17, 24 आणि 31 मार्च रोजी बँकांमध्ये नियमित सुट्ट्या असतील.

Bank Holidays
Bank HolidaysSakal

महाराष्ट्रात महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे या निमित्त बँकांना सुट्टी असेल याशिवाय सर्व रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

Bank Holidays In March
RBI: सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे होणार सोपे; RBI ने PPIला दिली मान्यता

आजकाल बँकिंग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. अशा स्थितीत बँका बंद केल्याने छोट्या व्यवहारांवर काही फरक पडणार नाही. कारण, UPI पेमेंट सिस्टम आहे. मात्र, काही कामासाठी बँकेत जावे लागते. अशा परिस्थितीत, सुट्टीबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. बँकांच्या सुट्टीच्या तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in तपासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com