RBI: सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे होणार सोपे; RBI ने PPIला दिली मान्यता

Rbi Allows Banks To Issue Ppi: भारतात कोट्यवधी लोक दररोज सार्वजनिक वाहतूक वापरतात. तुम्हीही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. PPI च्या वापरामुळे, लोक सार्वजनिक वाहतुकीने अधिक सहज प्रवास करू शकतील.
rbi allows banks to issue ppi to public transport commuters know details
rbi allows banks to issue ppi to public transport commuters know details Sakal

Rbi Allows Banks To Issue Ppi: भारतात कोट्यवधी लोक दररोज सार्वजनिक वाहतूक वापरतात. तुम्हीही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना PPI म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारी करण्याची बँकांना परवानगी दिली आहे आणि PPI च्या वापरामुळे, लोक सार्वजनिक वाहतुकीने सहज प्रवास करू शकतील.

तुम्हाला कसा फायदा होईल?

सोप्या शब्दात सांगायचे तर, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बँका असे कार्ड किंवा वॉलेट देऊ शकतात, ज्याचा वापर करून तुम्ही डिजिटल पेमेंट करून कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीची तिकिटे सहज खरेदी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही सहज, लवकर पेमेंट करू शकाल आणि तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

rbi allows banks to issue ppi to public transport commuters know details
Lek Ladki Yojana :‘लेक लाडकी’, ‘सखी’ कागदावरच! ; एकही लाभार्थी अथवा वसतिगृहही नाही

PPI म्हणजे काय?

PPI म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स हे असे साधन आहे ज्यात तुम्ही पैसे टाकू शकता आणि त्याच्याद्वारे कोणत्याही वस्तू किंवा सेवेसाठी पैसे देऊ शकता. मेट्रो कार्ड हे PPI चे उदाहरण आहे. (RBI permits banks, non-banks to issue PPIs for making payments in public transport systems)

rbi allows banks to issue ppi to public transport commuters know details
Google Pay: यूजर्सना मोठा झटका! गुगल पे अमेरिकेत होणार बंद; काय आहे कारण?

RBI नियम बदलणार

आरबीआयने पीपीआयच्या मास्टर डायरेक्शनमधील बदलास मान्यता दिली आहे आणि बदलानंतर, पीपीआय जारी करणाऱ्या बँकांसह बिगर बँकिंग संस्था सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या प्रवाशांना पीपीआय जारी करू शकतात. यामुळे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याची सुविधा बऱ्याच अंशी डिजिटल होईल आणि प्रवासही अधिक सोपा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com