'या' सरकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मिळणार महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, FD पेक्षा मिळणार जास्त व्याज

देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश होता.
Mahila Samman Savings Certificate
Mahila Samman Savings CertificateSakal

Mahila Samman Savings Certificate (MSSC): सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने बँकेच्या सर्व शाखांमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 लाँच केले आहे. बँक ऑफ इंडिया ही पहिली सरकारी बँक आहे, जिने आपल्या सर्व शाखांमध्ये ही योजना सुरू केली आहे.

ICICI, Axis, HDFC आणि IDBI बँकेत हा गुंतवणुकीचा पर्याय लवकरच उपलब्ध होईल, असे नमूद करून वित्त मंत्रालयाने अलीकडेच एक नोटीस जारी केल्यावर बँकेने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरू केले आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजे काय?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने जाहीर केले आहे. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश होता.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची विशेष वैशिष्ट्ये:

  • ही बचत करणारी योजना आहे, ज्यामध्ये दोन वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. या योजनेत मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

  • यामध्ये 7.5 टक्के व्याज दिले जाते आणि ते दर तिमाहीत गुंतवणुकीत जोडले जाते.

  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते. त्याच वेळी, अल्पवयीन मुलीचे खाते तिच्या पालकांच्या वतीने उघडले जाऊ शकते.

  • किमान गुंतवणूक रु. 1,000 आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा रु. 2 लाख आहे.

  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर TDS कापला जात नाही आणि आयकराच्या कलम 80C चा लाभही मिळतो.

Mahila Samman Savings Certificate
Gautam Adani: हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम, 2023 मध्ये गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये 60 अब्ज डॉलरची घसरण

केव्हा-केव्हा खाते बंद केले जाऊ शकते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र बंद करण्याबाबत अतिशय कडक नियम करण्यात आले आहेत. ही योजना काही विशिष्ट परिस्थितीत बंद केली जाऊ शकते.

  • खातेधारकाच्या मृत्यूनंतर हे खाते बंद केले जाऊ शकते.

  • जर एखादा खातेदार गंभीर आजाराचा बळी ठरला किंवा त्याच्या पालकाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत सर्व कागदपत्रे दाखवून खाते बंद केले जाऊ शकते.

  • या सर्वांशिवाय, खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतरही ते बंद केले जाऊ शकते. मात्र त्यानंतर खातेदारांना केवळ 2 टक्के कमी व्याज दिले जाईल.

Mahila Samman Savings Certificate
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com