PF Balance: कंपनीने PF खात्यात पैसे जमा केले की नाही हे कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

PF Balance: कंपनीने तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा केले आहेत की नाही हे तुम्ही स्वतः पाहू शकता.
PF Balance
PF BalanceSakal

PF Balance: भारत सरकारच्या नियमांनुसार, अशी कोणतीही कंपनी जिथे कर्मचार्‍यांची संख्या 20 किंवा त्याहून अधिक असेल, तिथे कंपनीला कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्याचे पैसे द्यावे लागतात. जर कर्मचाऱ्याचे पीएफ खाते नसेल तर त्याला ते उघडावे लागेल आणि नंतर त्यात पैसे जमा करावे लागतील.

कंपनी स्वत: कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यात मूळ पगाराच्या किमान 12% रक्कम गुंतवणूक करते आणि कर्मचाऱ्यालाही तेवढीच रक्कम द्यावी लागते. मात्र, अनेक वेळा कंपन्या त्यात हेराफेरी करतात.

कर्मचारी आपल्या पीएफ खात्यात पैसे जातील असे गृहीत धरतात पण तसे होत नाही. अलीकडेच स्पाइसजेटच्या वैमानिकांनी याबाबत तक्रार केली होती. अशा बातम्या समोर येण्याची ही पहिलीच घटना नाही.

या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने आपल्या बाजूने आयकर कायद्यातही सुधारणा केली होती. नवीन नियमानुसार, जर कंपन्यांनी पीएफ खात्यात वेळेवर पैसे दिले नाही, तर त्यांना कर सवलतीचा दावा करता येणार नाही. कर्मचार्‍यांनी स्वत: या बाबतीत सतर्क राहावे आणि कंपनीने त्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत की नाही ते तपासत राहावे.

PF Balance
Social Security: SBI ने करोडो ग्राहकांसाठी सुरू केली नवी सेवा, फक्त आधार कार्डने होणार...

कसे तपासायचे?

कंपनीने तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा केले आहेत की नाही हे तुम्ही स्वतः पाहू शकता. यासाठी तुम्ही ईपीएफओच्या पोर्टलवर किंवा उमंग अॅपवर जाऊ शकता. या दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमचे पीएफ पासबुक तपासू शकता.

EPFO पोर्टलवर तुमची नोंदणी करून तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड जनरेट करावा लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करून पासबुक सहज पाहू शकाल. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचा UAN सक्रिय करावा लागेल. हे तुम्ही उमंग अॅपद्वारेही करू शकता.

PF Balance
दारू बनवणाऱ्या कंपनीचा अजब निर्णय, 2,600 कोटींची कंपनी फक्त 90 रुपयांना विकली

मेसेजद्वारे पासबुक पहा

तुम्ही तुमच्या पीएफ खात्याचे पासबुक एसएमएसद्वारेही पाहू शकता. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG फॉरमॅटमध्ये 7738299899 वर मेसेज पाठवावा लागेल.

तुम्ही ज्या भाषेत संवाद साधू इच्छिता ती भाषा निवडू शकता. तुम्हाला इंग्रजीत मेसेज हवा असल्यास ENG लिहा. तुम्हाला मराठीत संवाद साधायचा असेल तर MAR लिहा. उदाहरणार्थ EPFOHO UAN MAR.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com