
Ganesh Chaturthi 2025 Investment Lessons To Learn From Lord Ganesha: आजपासून देशात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणपतीला बुद्धीची देवता म्हणतात. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी गणपतीचे नाव घेतले जाते. जेणेकरून सर्व अडथळे दूर होतात आणि काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होते अशी पारंपारिक मान्यता आहे.
गणेशाचे रूप पाहिले तर ते रूपही आपल्याला खूप काही शिकवण देते. आज प्रत्येक घरी गणपतीचे आगमन होत असताना गणपतीच्या रूपातून काही आर्थिक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गुंतवणूक करा.