Gold Silver Price : खुशखबर! या महिन्यात सोने 3,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Silver Price

Gold Silver Price : खुशखबर! या महिन्यात सोने 3,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Price Today : गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याने 58,800 चा विक्रमी उच्चांक गाठला. पण आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने विक्रमी उच्चांकावरून 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये या आठवड्यात सोन्यामध्ये घसरण दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी 58,800 रुपयांवर असणारे सोने गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी 56,100 च्या पातळीवर आले आहे, म्हणजेच त्याची किंमत 2,700 रुपयांनी खाली आली आहे.

फ्युचर्स मार्केटमधील सोन्याचे दर (Gold MCX ) :

जर आपण फ्युचर्स मार्केटच्या दरांवर नजर टाकली, तर आज सुरवातीला गोल्ड फ्युचर (Gold MCX) 45 रुपये म्हणजेच 0.08% च्या किंचित वाढीसह, ते 56,171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यापार करत होते. मागील सत्रात सोने 56,126 वर बंद झाले होते.

जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे बुधवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 475 रुपयांनी घसरून 56,345 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 56,820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भावही 195 रुपयांनी घसरून 65,925 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 57,600 रुपये

दिल्ली - 56,880 रुपये

हैदराबाद - 56,730 रुपये

कोलकत्ता - 56,950 रुपये

लखनऊ - 56,880 रुपये

मुंबई - 56,730 रुपये

पुणे - 56,730 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते