Gold Silver Price : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं एवढ्यानं महागलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असणार त्यामुळे सोने चांदीमध्ये वाढ अपेक्षित होती.
Gold Silver Price on akshaya tritiya
Gold Silver Price on akshaya tritiyasakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून आला होता. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने चांदीचे दरात तेजी दिसून येत आहे. आज सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असणार त्यामुळे सोने चांदीमध्ये वाढ अपेक्षित होती.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,050 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,150 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 769 रूपये आहे. (Gold Silver Price update 22 April 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,150 रुपये

दिल्ली - 61,300 रुपये

हैदराबाद - 61,150 रुपये

कोलकत्ता - 61,150 रुपये

लखनऊ - 61,300 रुपये

मुंबई - 61,150 रुपये

पुणे - 61,150 रुपये

Gold Silver Price on akshaya tritiya
Gold Silver Price : अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोनं चक्क 600 रुपयांनी महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Silver Price on akshaya tritiya
Gold Silver Price : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Silver Price on akshaya tritiya
Gold Rate Hike : सोन्याला ‘सोन्या’चे दिवस..! दशकात तब्बल 40 हजार रुपयांची दरवाढ..

नवा नियम

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com