Gold Silver Price : वीकेंडला एवढं सोनं-चांदी महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज मात्र वीकेंडला सोन्याचे दर स्थिर आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे.
Gold Silver Price
Gold Silver Pricesakal

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. आज मात्र वीकेंडला सोन्याचे दर स्थिर आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,750 तर 24 कॅरेट साठी 56,750 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 669 रुपये आहे. (gold silver price update 4 March 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 57,160 रुपये

  • दिल्ली - 56,600 रुपये

  • हैदराबाद - 56,450 रुपये

  • कोलकत्ता - 56,450 रुपये

  • लखनऊ -54,600 रुपये

  • मुंबई - 56,450 रुपये

  • नागपूर - 56,450 रुपये

  • पुणे - 56,450 रुपये

Gold Silver Price
Gold-Silver Price : खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 550 रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Price
Gold-Silver Price : खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 550 रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com