Gold Rate Today: आज सोने झाले स्वस्त; तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे?

Gold-Silver Rate Today 14th March 2024: गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्यानंतर त्यात घसरण दिसून येत आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 130 रुपयांवरून 250 रुपयांवर घसरला आहे.
Gold-Silver Rate Today 14th March 2024
Gold-Silver Rate Today 14th March 2024Sakal

Gold-Silver Rate Today 14th March 2024: गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्यानंतर त्यात घसरण दिसून येत आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 130 रुपयांवरून 250 रुपयांवर घसरला आहे.

दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,260 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 67,930 रुपये आहे. सोन्याचा सर्वाधिक भाव चेन्नईमध्ये आहे. एक किलो चांदीचा भाव 77,000 रुपये आहे.

दिल्लीत आज सोन्याचा भाव

14 मार्च 2024 पर्यंत दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव अंदाजे 60,750 रुपये आहे, तर 24 कॅरेट10 ग्रॅमचा सोन्याचा भाव अंदाजे 66,260 रुपये आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव 60,600 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,110 रुपये आहे.

अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव 60,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,160 रुपये आहे.

सोन्याच्या भाव 'या' कारणांवर अवलंबून असतात

सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. सोन्याची मागणी वाढल्यास भावही वाढतात. सोन्याचा पुरवठा वाढला तर भाव कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या भावावर परिणाम होतो.

Gold-Silver Rate Today 14th March 2024
SEBI-NISM Conference : बाजारातील फुगवटा गंभीर नाही; ‘सेबी-एनआयएसएम’ परिषदेत उदय कोटक यांचे प्रतिपादन

उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते.

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

Gold-Silver Rate Today 14th March 2024
Stock Market Crash: शेअर बाजार कोसळल्यानंतर अदानींचे 90,000 कोटी तर अंबानींचे 30,000 कोटी बुडाले

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com