Disinvestment: मोदी सरकार देशातील दोन सर्वात मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

Disinvestment: आर्थिक वर्ष 2024/25 मध्ये, केंद्र सरकार भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मधील हिस्सेदारी विकू शकते. एका सरकारी अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
Govt open to selling stake in GIC Re, LIC in FY24/25 says report
Govt open to selling stake in GIC Re, LIC in FY24/25 says report Sakal

Disinvestment: आर्थिक वर्ष 2024/25 मध्ये, केंद्र सरकार भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मधील हिस्सेदारी विकू शकते. एका सरकारी अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, गुंतवणूकदारांच्या मागणीचे मूल्यांकन केल्यानंतर भारत सरकार जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि एलआयसीमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.

GIC मधील 10% स्टेक विकण्याची योजना

सरकारी अधिकाऱ्याने सांगितले GIC मधील 10% स्टेकची विक्री विशिष्ट कालावधीत केली जाईल. ज्यामधून सरकारला कंपनीच्या शेअरच्या दरानुसार सुमारे 5,700 कोटी रुपये मिळतील. गेल्या सहा महिन्यांत GIC चे शेअर्स सुमारे 45% वाढले आहेत.

LIC बाबत काय आहे प्लॅन?

एलआयसीचे शेअर्स जोरदार कामगिरी करत आहेत. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत 58% वाढले आहेत आणि शुक्रवारी 973 रुपयांवर बंद झाले आहेत. LIC च्या IPO मध्ये, सरकारने कंपनीतील 3.5% हिस्सा विकला होता आणि इंडेक्स फंडमध्ये विमा कंपनीचा समावेश करण्यासाठी आणखी 1.5% हिस्सा विकण्याची योजना आखली होती.

सरकार एलआयसीमधील आपला हिस्सा छोट्या हप्त्यांमध्ये विकू शकते. हे बाजारातील गुंतवणूक क्षमता आणि कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीवर अवलंबून असेल. गेल्या सहा महिन्यांत LIC चे शेअर्स सुमारे 54 टक्क्यांनी वाढले आहेत. सरकारने एलआयसीचा इंडेक्स फंडात समावेश करून 1.5 टक्के हिस्सा कमी करण्याची योजना आखली होती.

Govt open to selling stake in GIC Re, LIC in FY24/25 says report
Tata Sons: टाटा सन्सने ठोठावला आरबीआयचा दरवाजा; आयपीओ बाबत घेणार मोठा निर्णय

एलआयसी कंपनीतील एक छोटासा हिस्सा विकणे ही बाजारासाठी मोठी एफपीओ ऑफर असेल. जर सरकारने LIC मधील 1.5 टक्के हिस्सा विकला तर त्याचे बाजारातील मूल्य सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार सुमारे 9,200 कोटी रुपये होईल.

Govt open to selling stake in GIC Re, LIC in FY24/25 says report
Multibagger Stocks: 4 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल! 8 रुपयांचा शेअर पोहचला 800 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com