Adani Group: ''मोदी सरकार सत्तेत असो किंवा नसो' अदानींच्या कंपन्यांवर...'' राजीव जैन यांचा मोठा दावा

भारतातील खाजगी बँका, आयटी कंपन्या आणि ग्राहक कंपन्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.
 Adani Group
Adani GroupSakal

Rajiv Jain on Adani Group: अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप 100 बिलियन डॉलरच्या खाली घसरले आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते.

मात्र गौतम अदानी यांचे अमेरिकन मित्र आणि GQG पार्टनर्सचे प्रमुख राजीव जैन यांनी अदानी आणि समूहाबद्दल वारंवार महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.

यावेळी त्यांनी मोदी सरकारलाही या प्रकरणात आणले आहे. मोदी सरकार सत्तेत राहो अथवा न राहो, अदानी ग्रुपवर कोणताही परिणाम होणार नाही, तो प्रगती करत राहणार, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

मार्च महिन्यापासुन राजीव जैन यांनी अदानी समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. तेव्हापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुधारणा होऊ लागली आहे.

सध्या अदानी समूहाचे मार्केट कॅप 10 लाख कोटींच्या आसपास आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गुंतवणूकदारांचा अदानी समूहावरील विश्वास उडाला होता.

राजीव जैन यांनी अदानी समूहात मोठी गुंतवणूक सुरू केली आणि गुंतवणूकदारांना समूहावर विश्वास ठेवण्यासाठी आश्वस्त केले.

भारतीय कंपन्यांमध्ये 13 अब्ज डॉलरची गुंतवणूक:

राजीव जैन यांनी फक्त अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक केली नाही, तर देशातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे.

Economic Times च्या अहवालानुसार, राजीव जैन यांनी देशातील विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 13 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये ITC, सन फार्मा, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक आणि HDFC मध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

राजीव जैन भारतात आणखी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. ते अदानी समूहाच्या कंपन्यांवर सतत विश्वास व्यक्त करत असून अदानींच्या कंपन्यांवरील जोखीम त्यांनी नाकारली आहे.

राजीव जैन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारतात मोदी सरकार राहो अथवा न राहो, अदानी समूहाच्या कंपन्याची प्रगती होत राहणार आहे. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की भारतातील खाजगी बँका, आयटी कंपन्या आणि ग्राहक कंपन्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.

 Adani Group
Toor Dal Price: तूर आणि उडीद डाळींच्या वाढत्या किंमतीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय, लोकांना होणार...

भारताच्या पायाभूत क्षेत्रात अदानींचे योगदान:

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणुकदारांचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्यानंतर राजीव जैन यांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

मार्चपासून आत्तापर्यंत राजीव जैन यांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 2.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. देशाच्या पायाभूत क्षेत्रात अदानी समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. त्याचा मोदी सरकारशी काहीही संबंध नाही

 Adani Group
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com