HDFC Bank: RBIने HDFC बँकेला दिली मान्यता; येस बँकेसह 'या' 6 बँकांमधील भागभांडवल खरेदी करणार

HDFC Bank: देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने आज सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून संपादनाला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर, एचडीएफसी बँक आता आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेसह 6 बँकांमधील प्रत्येकी 9.5 टक्के भागभांडवल खरेदी करू शकते.
HDFC Bank Gets RBI Approval To Acquire Up To 9.5 percent Stake In ICICI Bank, Axis Bank, 4 others
HDFC Bank Gets RBI Approval To Acquire Up To 9.5 percent Stake In ICICI Bank, Axis Bank, 4 others Sakal

HDFC Bank: देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने आज सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून संपादनाला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर, एचडीएफसी बँक आता आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेसह 6 बँकांमधील प्रत्येकी 9.5 टक्के भागभांडवल खरेदी करू शकते.

HDFC बँकेने सांगितले की, रिझर्व्ह बँकेने 5 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली. एचडीएफसी बँक ग्रुपमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

HDFC Bank Gets RBI Approval To Acquire Up To 9.5 percent Stake In ICICI Bank, Axis Bank, 4 others
PAN Aadhaar linking: सरकारची तिजोरी भरली! पॅन-आधार जोडणीतून वसूल केला 'इतक्या' कोटींचा दंड

RBI ने दिलेली ही मान्यता एका वर्षासाठी वैध आहे आणि जर HDFC बँक त्या कालावधीत शेअरहोल्डिंग मिळवण्यात अपयशी झाली तर ही मान्यता रद्द केली जाईल.

HDFC समूह येस बँक, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, बंधन बँक, ICICI बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रस्तावाला RBI ने मंजुरी दिली आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

लोकांच्या मनात प्रश्न आहे की या संपादनाचा त्यांच्या बँकिंग सेवेवर परिणाम होईल का? या अधिग्रहणाचा इंडसइंड बँक, येस बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँका, बँकिंग सेवा आणि ग्राहकांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.

HDFC Bank Gets RBI Approval To Acquire Up To 9.5 percent Stake In ICICI Bank, Axis Bank, 4 others
Paytmवर कारवाई केल्याप्रकरणी PM मोदी अन् RBIला भारतीय स्टार्टअप्सच्या मालकांचं पत्र! काय आहे म्हणणं?

HDFC बँक समूहाला RBI ने ICICI बँक आणि Axis बँकेसह 6 बँकांमधील 9.5 टक्के भागभांडवल विकत घेण्यास मान्यता दिली आहे. या वृत्तामुळे अनेक दिवसांपासून घसरणीसह व्यवहार करणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज किंचित वाढ दिसून आली. आज दुपारी 1.45 पर्यंत या शेअरने 1447 रुपयांचा उच्चांक गाठला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com