

मीरा-भाईंदरमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. 'टोरेस ज्वेलरी कंपनी'ने हजारो गुंतवणूकदारांना कोरोडो रुपयांचा गंडा घातला आहे. सोने, चांदी आणि मोइसॅनाइट स्टोनवर जबरदस्त रिटर्न देणार असे स्वप्न दाखवत, या कंपनीने हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये गोळा केले... आणि कंपनीचे मालक रातोरात गायब झाले.
संपूर्ण घटना समजून घ्यायची तर थोडं मागं जावं लागेल. 2023मध्ये ‘प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने ‘टोरेस’ ब्रँड अंतर्गत सुरुवात केली. दादरमध्ये 30 हजार चौरस फूटाचा भव्य आउटलेट सुरू झाला आणि त्यानंतर मीरा-भाईंदरसह अनेक ठिकाणी दुकानं उघडली.