

Income Tax Raids on Kalpataru Group: कल्पतरू ग्रुप या दिग्गज बांधकाम कंपनीवर आयकर विभागाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कडक कारवाई केली आहे.
बरोबर 20 दिवसांपूर्वी, आयकर पथकाने कंपनीच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये (IT Raid) छापे टाकले आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरीचा तपास सुरू आहे. आता प्राप्तिकर विभागाला कल्पतरू ग्रुपचे सुमारे 600 कोटी रुपयांचे बनावट बिलिंग तपशील सापडले आहेत.
राजस्थानच्या राजकीय घराण्याशी जवळीक
4 ऑगस्ट रोजी आयकर विभागाच्या पथकाने कल्पतरू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयावर छापे टाकले होते. कंपनीच्या मुंबई, गुजरात, राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले.
त्यानंतर जवळपास आठवडाभर चाललेल्या या छाप्यात विभागाच्या हाती करचुकवेगिरीशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.
अहवालानुसार, बनावट बिलिंगद्वारे कल्पतरू कंपनीने 600 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासोबतच राजस्थानमधील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाशी असलेल्या या ग्रुपचे जवळचे संबंधही समोर आले आहेत.
30 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले
जवळपास तीन दशकांपासून कल्पतरू ग्रुप देशभरात बांधकाम, ऊर्जा आणि रिअल्टी क्षेत्रात काम करत आहे. यामध्ये बनावटगिरी सुरू असतानाच हा ग्रुप प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आला आणि हे प्रकरण गांभीर्याने घेत 4 ऑगस्ट रोजी विभागाकडून कंपनीच्या 30 ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर त्यात सापडलेल्या कागदपत्रांची आणि खात्यांची चौकशी सुरू झाली, ती अजूनही सुरूच आहे.
जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये चुका उघड!
या छाप्यात अधिकाऱ्यांनी या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू जप्त करून तपास पुढे नेला असून, आता बिलिंग फसवणुकीचा मोठा खुलासा केला आहे.
मात्र, या बनावटगिरीबाबत कल्पतरू कन्स्ट्रक्शनकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ''कंपनीचे अधिकारी आयकर विभागाला पूर्ण सहकार्य करीत आहेत, जी माहिती मागितली आहे ती पुरवीत आहेत. कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणेच सुरू आहे."
मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीत कंपनीच्या विविध कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या वह्या व खात्यांच्या तपासणीत ही मोठी हेराफेरी उघडकीस आली आहे.
या बातमीने कंपनीचा शेअर घसरले
प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर झालेल्या या खुलाशाचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही दिसून आला आहे. गुरुवारी शेअर बाजारातील कंपनीचे शेअर्स व्यवहाराअंती 1.10 टक्क्यांनी किंवा 7 रुपयांनी घसरून 628.40 रुपयांवर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.