

Gold and silver bars stuck at Indian customs due to delayed DGFT import approval, raising concerns over supply shortages.
esakal
एलपीजीच्या तुटवड्यानंतर,देशाला आता सोने आणि चांदीच्या टंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांनी परदेशी पुरवठादारांकडून सोने आणि चांदी आयात करण्याच्या ऑर्डर्स थांबवल्या आहेत. अनेक टन सोने आणि चांदी कस्टमकडे अडकून पडले आहे; कारण त्यांच्या आयातीला अधिकृत परवानगी देणारा कोणताही औपचारिक सरकारी आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही.