Asian Development Bank : विकासदर सात टक्के राहण्याचा अंदाज ; आशियाई विकास बँकेकडून अंदाजात ०.३ टक्के वाढ

जागतिक बँक, मूडीजपाठोपाठ आशियाई विकास बँकेनेही (एडीबी) आर्थिक वर्ष २०२४-२५साठी भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीचा (जीडीपी) दर सात टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
Asian Development Bank
Asian Development Banksakal

नवी दिल्ली : जागतिक बँक, मूडीजपाठोपाठ आशियाई विकास बँकेनेही (एडीबी) आर्थिक वर्ष २०२४-२५साठी भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीचा (जीडीपी) दर सात टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. बँकेने यापूर्वी ६.७ टक्के अंदाज वर्तवला होता, त्यात आता ०.३ टक्के वाढ केली आहे.

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीसह ग्राहकांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने बँकेने ‘जीडीपी’च्या अंदाजात वाढ केली आहे. ‘आशिया विकास अंदाज एप्रिल २०२४’ या अहवालात बँकेने हा अंदाज नोंदवला आहे.

केंद्र आणि राज्यसरकारकडून केला जात असलेला पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च, खासगी क्षेत्रातील वाढती गुंतवणूक, सेवा क्षेत्राची उत्तम कामगिरी आणि ग्राहकांकडून वाढणारी मागणी यामुळे चालू आर्थिक वर्षातील वाढीला चालना मिळेल, असे या अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निर्यातीतील वाढ, उत्पादन आणि कृषी उत्पादनातील वाढ यामुळे विकासाचा वेग आणखी वाढेल, असेही ‘एडीबी’ने म्हटले आहे.

प्रमुख कारणे...

  • पायाभूत सुविधांवर मजबूत भांडवली खर्च

  • उत्पादन व सेवा क्षेत्रात वेगवान आणि उत्तम वाढ

  • ग्राहकांच्या मागणीत सुधारणा

  • महागाई कमी झाल्यामुळे चलनविषयक धोरणात सुधारणा

Asian Development Bank
Sharad Pawar : लोकशाहीत विरोधकांना सन्मान द्यायचा असतो ; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भाजपवर टीका

आगामी काळातही वाढीचा वेग चांगला राहील. महागाईदरही २०२४-२५ मध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असून, तो २०२६ मध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. यंदा पाऊसही सरासरीइतका होण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राचे उत्पादनही चांगले असेल. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांची मागणी वाढल्यामुळेही विकासाचा वेग वाढेल.

— मिओ ओका, संचालक, ‘एडीबी’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com